झी मराठी अपडेट: झी टिवी ही प्रेक्षकांची अत्यंत लाडकी वाहिनी आहे. झी च्या प्रेक्षकांची खासीयत म्हणजे नियमित पने रोज च्या रोज सिरियल ,रियलिटी शो , पहाणारे प्रेक्षक. झी च्या अनेक मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. सध्या ज्या सर्वात ज्यास्त पाहण्यात येत आहेत त्या काही निवडक सिरियल म्हणजे “नवरी मिळे हिटलरला“, “अप्पी आमची कलेक्टर”, “पारू” या शिवाय रियलिटी शो मधील जाऊ बाई जोरात या शो ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे नवीन काही घेऊन येणाच्या मानस झी ती वी करत आहे आणि आता लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे “चल भावा सिटीत”
झी मालिकां सोबत रियलिटी शो च्या यादीत आता एका शो ची भर पडणार आहे. नुकताच झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर टिझर पाहण्यात आला होता. जो पाहून हा कार्यक्रम नक्की काय आहे या बाबत प्रेकाशकांना थोडी बहुत माहिती मिळाली आहे ,मग रिऍलिटी शो आहे हे आत्ता निश्चित झाले आहे आणि या मुळे सगळ्यांना पडलेल्या प्रश्नाचे आता उत्तर मिळाले आहे . तर हा एक असा शो आहे जो मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा बदलणार आहे. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘चल भावा सिटीत’ हा नवा कोरा शो सुरु होतोय.
गावातील खेड्यापाड्यात राहणारे लोक या नव्या कोर्या शो चे स्पर्धक राहणार आहे सोबर आसणार शहरी नायिका
चल भावा सिटीत या शोची संकल्पना थोडी वेगळी आहे.पूर्वी जाऊ बाई जोरात या शो मध्ये शहरातील लोक हे गावात राहून या स्पर्धा पूर्ण केला होता.आता चा हा शो ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धकांना एकत्र आणणार आहे. यात स्पर्धकांना अशा आव्हानांना सामोरे जावे लागेल जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास प्रवृत्त केले जाईल.
ग्रामीण आणि शहरी भागातील स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील आणि त्यांना आव्हान देतील. ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल. सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईलच पण त्या बरोबर जी गमतजमत आपल्याला पाहायला मिळणार आहे ती खूप वेगळी आसणार आहे
आता सिटी गाव गाजणार आणि होणार धम्माल प्रेक्षकांची कोण असणार या शो चा सुत्रधार ?
या शोच्या माध्यमातून एक अफलातून संकल्पना समोर येणार आहे. जिचा प्रेक्षकांनी विचारसुद्धा केला नसेल. ‘चल भावा सिटीत’ हा शो झी मराठी वाहिनीवर लवकरच सुरु होणार आहे. जो मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा बदलेल अशी आशा मेकर्सने व्यक्त केली आहे. सध्या तरी झी मराठीच्या इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला प्रोमो व्हायरल होतोय. या नव्याकोऱ्या शोचा सूत्रधार कोण असणार? याचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पहायला मिळतेय. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाचे रंग उधळणारा ‘चल भावा सिटीत’ आता कधी येणार? याची प्रतीक्षा केली जात आहे.
ठरलं तर मग या शो चा सुत्रधार असणार मराठी हिन्दी चित्रपट सिनेमा चा एक लोकप्रिय चेहरा
चल भावा सिटीत या आगळया वेगळ्या शो चे सूत्रसंचालन कोण करणार याची उत्कंठा सर्वांनाच होती आणि आता ती संपली आहे कारण या शो चे सूत्रसंचालन करणार आहे मराठी आणि हिन्दी चित्रपट जगतातील एक मोठे नाव श्रेयस तळपदे हे करणार आहेत सूत्रसंचालन.एक प्रमो मध्ये हे आता दाखवण्यात आले आहे.श्रेयश तळपदे चा चाहता वर्ग खूप मोठा आहे त्या मुळे नकीच या शो ला एक चांगला प्रतिसाद मिळणार हे नक्की.
उद्या पासून म्हणजेच १५ मार्च पासून चालू होणार्या या रियालिटी शो चे असे आसणार वेळापत्रक
झी च्या या शो ची आता प्रतीक्षा संपली आहे आता आपण झी टीव्ही वर उद्या म्हणजेच १५ मार्च पासून रोज आपल्या लाडक्या झी मराठी वर पाहू शकतो.या मध्ये सहभागी जे स्पर्धक आहे त्यांची अधिकृत माहिती आतापर्यंत गुपित आहे पण खेडेगातील स्पर्धक हे या शो चे मुख्य आकर्षण नक्कीच आसणार आहे.सोबत सूत्रसंचालन श्रेयस तळपदे करणार म्हणजे लोकप्रियता नक्कीच शिगेला पोहचली आहे या शो च्या परमो मध्ये गावातील रांगडा गडी जो एक पहिलवान आहे आणि घरोघरी वेशांतर करुण आपला उदरनिर्वाह करणार सोंगाड्या सुद्धा आहे ही आशी साधी माणसं हे या शो लोकप्रिय होणार या मागचं कारण आसणार आहे

आम्ही ही पाहणार आहोत एक आगळावेगळा कार्यक्रम ऑनलाइन साठी खाली पहा तसेच झी ५ मोबाईल प्ले स्टोअर वरुण डाउनलोड करा .
https://www.zee5.com/tv-shows/lang/marathi