मुंबई :मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीची एक अत्यंत गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे आज निधन झाले आहे.प्रिय ही केवळ वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी, कर्करोगाशी दीर्घकालीन झुंज देत तिने अखेरचा श्वास घेतला, आणि त्यांच्या या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.दोन वर्षा पासून जी कर्करोगा सोबत चाललेली लढत आज अखेर संपली.
प्रियाचा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील आज पर्यन्तचा प्रवास कसा होता
प्रिया मराठे यांचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी मुंबईत झाला.माध्यम वर्गीय कुटुंबात प्रिया ने आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी `मराठी मालिका मध्ये काम करण्यास सुरुवात केली त्या पैकी काही ‘या सुखानो या’ या मालिकेतून २००७ मध्ये त्यांनी अभिनयाची सुरुवात केली, आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.’चार दिवस सासूचे’ या मराठी मालिकांतून कारकिर्दीची सुरुवात केली ज्या एकेकाळी खूप लोकप्रिय होत्या शिवाय या मधील प्रत्येक कैरेक्टर हे गाजलेले होत .या नंतर प्रियला हळूहळू ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ सारख्या हिंदी मालिकांमधून देशभरात लोकप्रियता मिळवली. ‘पवित्र रिश्ता’मधील ‘वर्षा’ ही भूमिका आणि अनेक मराठी-हिंदी मालिका तसेच चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.या हिन्दी मालिका दरम्यान प्रिया आणि सुशांतसिह यांची ही मैत्री जमली होती
“पवित्र रिश्ता” मधील त्यांच्या ‘वर्षा’ या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली
त्यांच्या अभिनयात त्यांनी “बड़े अच्छे लगते हैं” (ज्योति मल्होत्रा), “साथ निभाना साथिया” (भवानी राठोड) या मालिकांमध्ये विलक्षण नकारात्मक (विलन) भूमिका साकारून त्यांच्या अभिनयदंडाला नवे आयाम दिले आहे त्याचबरोबर त्यांनी ‘कॉमेडी सर्कस’मध्ये कॉमिक टेलेंट दाखवून आपल्या अभिनयाच्या बहुमुखीतेचा परिचय दिला
तसेच विविध मराठी चित्रपटांमध्ये (जसे की “Humne Jeena Seekh Liya”, “Ti Ani Itar”) आणि एकूण अभिनय प्रवासात त्यांचे योगदान खूप समृद्ध होते

काही वर्षा पूर्वीच प्रिया मराठे ला कर्करोगाचे निदान झाले होते
गेल्या काही वर्षांपासून प्रिया मराठे कर्करोगाशी झुंज देत होत्या. मेडिकल ट्रीटमेंटमुळे सुरुवातीला थोडे सुधारणा दिसली, मात्र नंतर आजाराचा जोर वाढला आणि शरीराने ट्रिटमेंटला प्रतिसाद देणे थांबवले. अखेर ३१ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी मुंबई येथील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला.
प्रियाआणि शंतनु याची एक वेगळीच प्रेम कहाणी होती अनेक वर्ष मैत्री नंतर थेट लग्न
प्रिय मराठे आणि शंतनु मोगे हे दोघे मराठी मालिका मधील नावाजलेले कळकर आहेत शंतनुची स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मधील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही त्यांच्या आज पर्यंतच्या कारकीर्द मधीक एक महत्वाची भूमिका होती असे त्यांनी एका मुलाखती दरम्यान संगितले आहे.दोघे अनेक वर्ष काम केल्यानंतर शंतनु यांनी प्रियाला लग्नासाठी मागणी घातली असे एका मुलाखती दरम्यान सांगण्यात आले दोघांनी २४ एप्रिल २०१२ रोजी सुखी संसार धाटला आणि आपल्या प्रेमाला एका नवरा आणि बायको या बंधनात बांधून घेतले शर्वरी लोहकार यांच्या मुळे या दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती.शंतनु यांची ‘रावरंभा’ व ‘एनीग्मा’ सारख्या चित्रपटांतून एक वेगळी ओळख सुद्धा निर्माण झाली होती.
देवभाबळी या नाटकाचे शो आजूनही हाऊसफुल्ल प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद विटठ्ला च्या भक्तीचा मार्ग
शंतनु आणि प्रिया सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव
अनेक कलाकारा प्रमाणे शंतनु आणि हे सुद्धा अनेक मराठी सन आणि काही आयुष्यातील खास वेळी instagram या सोशल मीडिया वर नेहमीच अॅक्टिव असताना दिसले या जोडप्यासाठी आनेक लाइक सुद्धा मिळत होते प्रिया मराठे च्या अचानक जा ण्याने त्याच्या वर भावपूर्ण श्रद्धांजली चे मेसेज येत आहेत.
प्रिया मराठे ला अंतिम निरोप देण्यासाठी अनेक कालकरांची हजेरी
प्रिया मराठे च्या निधनाची बातमी सोशल मीडिया मार्फत मिळाली तेव्हा अनेक मराठी कलाकारांनी प्रियाच्या राहत्या घरी तिचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली सुबोध भावे यांनी सोशल मीडिया वर पोस्ट टाकत बोलले माझा अजूनही या घोष्टीवर विश्वास बसत नाही उषा नाडकर्णी यांनी ही भावपूर्ण श्रधजली वाहिली अमृता खानविलकर , यांनी सोशल मीडिया मार्फत पोस्ट केल्या आहेत , अभिजित केळकर, आस्ताद काळे, समिधा गुरु, शर्मिष्ठा राऊत,अभिजीत खांडेकर आणि प्रार्थना बेहेरे ला तर अश्रु आणवर झाले.


प्रिया मराठे यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच मनःपूर्वक प्रार्थना. त्यांच्या अभिनयाचा ठसा आणि दिलखुलास स्वभाव सर्वांच्या आठवणीत कायम राहतील.
आमच्या funmarathimedia.com कडून प्रिया मराठेला भावपूर्ण श्रद्धांजली मराठी नवनवीन उपडेट साठी आमच्या सोबत रहा
