Marathi Film Nibaar

Marathi Film Nibaar update: मराठी सिनेमांनी आजवर विविध सामाजिक विषयांवर आधारित कथा प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. २०२४-२०२५ या काळातही ही परंपरा चालू असून, एकाहून एक सरस चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकले.या यशस्वी मालिकेत आता आणखी एक चित्रपट येतोय – “निबार”, जो आपली कहाणी शिक्षण व्यवस्था आणि समाजातील वास्तवावर आधारित घेऊन येत आहे.

‘निबार’ ची कथा काय आहे काय वेगळं पाहायला मिळणार या चित्रपटामध्ये?

“निबार” हा चित्रपट आपल्या आजूबाजूच्या समाज व्यवस्थेतील शिक्षणाचे वास्तव अधोरेखित करतो.गरीब आणि श्रीमंती या मधील शिक्षणाचा ही किती फरक आहे.रस्त्यावर भीक मागणारे मुले भंगार गोळा करणारी मुले यांच्यतील शिक्षनाची आवड आणि त्या मध्ये येणारे कटू प्रसंग त्यातून निघलेला मार्ग हे सर्ब या चित्रपटात पाहायला मिळणार.

चित्रपटाचा मुख्य संघर्ष हा शाळाबाह्य मुलांची कथा त्या मुलांना शाळेत आणण्याच्या प्रयत्नांभोवती फिरतो. एका शिक्षकाची कथा, जो आटोकाट प्रयत्न करूनही शाळेची पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. ही केवळ एक शाळा नसते, तर त्या शिक्षकासाठी ती एक सामाजिक जबाबदारी असते — शिक्षणाच्या प्रकाशात प्रत्येक मुलाचं आयुष्य उजळवण्याची.

या संघर्षात शिक्षकाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं शिक्षणाशिवाय जनगणना, मतदार यादी तयार करणे यांसारखी अशैक्षणिक कामंही तो प्रामाणिकपणे पार पाडतो. पण त्याचं खरं स्वप्न असतं, प्रत्येक मुलाला शाळेच्या अंगणात खेळताना पाहण्याचं, त्यांच्या डोळ्यांत भविष्याची चमक निर्माण करण्याचं.

शिक्षण म्हणजे केवळ नोकरीसाठी मिळणारी पात्रता नव्हे, तर ते माणसाला माणसासारखं जगायला शिकवतं. ते मुलांमध्ये विचारशक्ती, सामाजिक भान आणि आत्मभान जागृत करतं. हा चित्रपट केवळ एका शिक्षकाचा प्रवास नाही, तर तो आपल्या समाजाच्या शिक्षणव्यवस्थेची वास्तवदर्शी झलक आहे — जिथे अजूनही शिक्षकच एकट्यानं उजेड पेरण्याचा प्रयत्न करतो आहे. कशा प्रकारे आपली शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांच्या वास्तवाशी फारकत घेत चालली आहे, हे चित्रपटात प्रभावीपणे मांडले गेले आहे.एक शिक्षक, एक विद्यार्थी, आणि एक पालक यांची गुंतलेली कहाणी ही चित्रपटाची केंद्रबिंदू आहे.या चित्रपट आपल्या समाज व्यवस्थेवर आधारित आहे.

मराठी नाट्य कलेचे देव मानले जाणारे डॉ.श्रीराम लागू यांनी घेतला देवबाभळी या नाटकाचा आनंद कलाकारांचे केले मनभारुन कौतुक

चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे चला आपण पाहूया

‘निबार’ चित्रपटातील स्टारकास्ट – शशांक केतकर आणि सायली संजीव मुख्य भूमिकेत

निबार” हा चित्रपट द्रुव एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवला जात आहे. या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील काही आघाडीचे कलाकार आपल्याला झळकताना दिसणार आहेत.

शशांक केतकर, जे ‘मुरांबा’ आणि ‘होणार सून मी या घरची’ या सारख्या लोकप्रिय मालिकांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात पोहोचले आहेत, ते या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांची भूमिका आणि अभिनय कौशल्य प्रेक्षकांना पुन्हा एकदा विचार करायला लावणार, यात शंका नाही.

त्यांच्यासोबत सायली संजीव ही देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी सायली, या सिनेमाच्या कथेला एक वेगळी ताकद देईल, अशी अपेक्षा आहे.

निबार’ चित्रपटात आपल्याला अनेक दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे, जी या सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर आधारित कथेला एक वेगळेच उंचीवर घेऊन जाणार आहे.

🔹 देविका दफ्तरदार – अनुभवी आणि संवेदनशील अभिनेत्री, जी या चित्रपटात एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत झळकणार आहे.
🔹 शशांक शेंडे – हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते, यांचा अनुभव ‘निबार’ला ताकद देतो.
🔹 अरुण नलावडे – अनुभवसंपन्न अभिनेते, ज्यांचा अभिनय नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करतो.
🔹 शांता तांबे, राजेश दुर्गे आणि अनिकेत माळी – हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

या सर्व कलाकारांची उपस्थिती ‘निबार’ चित्रपटाच्या सशक्त कथाविषयाला समर्थ अभिनयाची साथ देते. एक सामाजिक आशय मांडताना जेव्हा अभिनय आणि दिग्दर्शन दोन्ही बळकट असतं, तेव्हा चित्रपट नक्कीच लक्षात राहतो.

चला या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संगीत या बाबत जाणून घेऊया

‘निबार’ या चित्रपटाचे चित्रीकरण द्रुव एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली पार पडले आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत:

  • संतोष भणगे
  • अनिकेत माळी
  • भरत सावंत

त्यांच्यासोबत सह-निर्मात्याची भूमिका साकारली आहे जितेंद्र भास्कर ठाकरे यांनी.
चित्रपटाची कथा राजेश दुर्गे आणि सुनील शिंदे यांनी लिहिलेली आहे, जी समाज आणि शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करते.

संगीताच्या बाजूला येऊन बघितल्यास, या चित्रपटाला संगीत दिले आहे रोहित नागभीड यांनी. गाणी लिहिली आहेत वैभव देशमुख यांनी, तर हे soulful गाणे आपल्या सुरेल आवाजात गायले आहेत आदर्श शिंदे आणि रोहित राऊत यांनी.

ही सर्व टीम मिळून ‘निबार’ ला एक समृद्ध कलात्मक अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे, जो प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ टिकून राहील.

प्रेक्षकांनी का पाहावा हा चित्रपट? काय विशेष पाहाला मिळणार आपल्याला या चित्रपटामध्ये

  • शिक्षण क्षेत्रावर भाष्य करणारी वास्तवदर्शी कथा
  • सामाजिक विचारांना चालना देणारा आशय
  • दिग्गज कलाकारांनी भरलेली कलाकृती
  • नवीन दिग्दर्शक/लेखकाची ताकदवान मांडणी
  • फॅमिलीसोबत पाहण्यासाठी योग्य

आपण सर्वांनी नक्की या एक वेगळ्या विषयाच्या चित्रपटाला दाद द्यावी प्रत्येकाने आपल्या जवळच्या सिनेमाग्रहात आपल्या कुटुंबासोबत नक्की पहायला हवा.

चित्रपटाचे ऑनलाइन बूकिंग साठी www.in.bookmyshow.com भेट द्या

One thought on ““निबार” शशांक केतकरचा बहुचर्चित चित्रपट 13 जूनपासून; शिक्षक, शिक्षण आणि समाजावर आधारित एक सशक्त कथा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *