मुंबई : आज मराठी सिनेमा हा एक वेगळ्या स्तरावर पोचला आहे. फक्त मराठी चित्रपटच नव्हे तर मराठी नाटक आणि मराठी संगीत यांनाही उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे.देवभाभळी सारखी नाटकं असोत किंवा फोल्क आख्यान सारखे संगीत कार्यक्रम असोत – प्रेक्षक मोठ्या उत्साहाने गर्दी करत आहेत थोडी कमी होती ती उत्तम सिनेमाची – आणि ती आज या “दशावतार” चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली असे आपण नक्की म्हणू शकतो.
चित्रपटगृहात प्रेक्षकांची कमी उपस्थिती, मोठ्या बजेटच्या हिंदी चित्रपटांसमोर मराठी चित्रपटांची मागे पडणारी ओळख – ही अनेक वर्षे चर्चेची विषयं होती. पण या सगळ्या समजुतींना छेद देत, ८१ वर्षांचे अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी अभिनयाच्या ताकदीने मराठी चित्रपटसृष्टीला नवी ऊर्जा दिली आहे
“दशावतार” बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल 81वर्षाचा तरुण पडतोय सर्व सिनेमावर भारी
या चित्रपटात अनेक नवीन कलाकार आहेत सिनेमाचा विषयच खूप वेगळा आहे त्या मुळे त्याच्याकडे लोक हे आपोआप खेचले जात आहे शिवाय तगडी स्टार कास्ट त्यातील आम्ही म्हटल्या प्रमाणे 81 वर्षाचा तरुण कलाकार कारण वय जारी 81 असल तरी त्यांनी जो अभिनय या चित्रपटात केला आहे तो खरच खूप सुंदर आहे एका तरुण कलाकाराला लाजवेल आसा त्यांचा आभिनय आहे दिलीप प्रभावलकर मराठी रंगभूमीचा एक अविभाज्य भाग ज्यांनी अनेक मराठी चित्रपट ,नाटक ,मराठी मालिका ,हिंदी चित्रपट अनेक वेगवेगळ्या भाषेत त्यांनी काम केले आहे.
या चित्रपटाची कथा सर्वांना आवडत आहे शिवाय दिलीप सरांचा आभिनय आपण या आधी अनेक वेळा पाहिला आहे प्रत्येक वेळी एक नव्या रंगात आपण त्यांना आज वर पहिले आहे आणि या सिनेमात तर त्यांना एक सुवर्ण संधीच मिळाली होती वेगवेगळ्या भूमिका करायची नावा प्रमाणे दशावतार हे त्यांनी या चित्रपटात घेतले आहे.बर्याच काळा नंतर मराठी सिनेमा साठी लागलेला हाऊसफुल्ल लागलेला बोर्ड पहिला आणि ही कमाल एका 81 वर्षाच्या तरुणाने केली आहे.या सिनेमात ज्या उत्साहाने त्यांनी काम केले आहे ते खूप कौतुकास्प आहे
दशावतार चित्रपटाची काय आहे कथानक
दशावतर सिनेमाची कथा आपल्याला थेट कोकणात घेऊन जाते आपल्या प्रथा ,परंपरा आपली संस्कृती याचा सुंदर मेळ या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतो.दशावतार हे नाटक संपूर्ण कोकणात स्वं. माधव मिस्त्री याच्या नजरेतून पहिलं आहे एकाच व्यक्तीने एकाच रंगभूमीवर सकारलेल्या वेगवेगळ्या भूमिका म्हणजे दशावतार भगवान विष्णु यांचे दहा अवतार या सिनेमात साकारले आहेत आणि ते उत्तम रित्या साकारले आहे
कथा आहे दशावतार करणार्या एका सामान्य माणसाची ज्याला नाटकात काही ना काही काम कराची हौस असते अनेक वर्ष काम केल्यावर जेव्हा त्यांचा मुलगा मोठा होतो आणि तो त्यांना आता माला नोकरी लागली की तुम्ही हे सर्व बंद करायचे सांगतो या नंतर या सिनेमात अनेक रंग दाखवण्यात आले आहेत.थोडा थ्रिलर,रोमान्स आहे सुंदर गाणी या सिनेमात आहे आणि याच चित्रीकरण सुद्धा खूप सुंदर रित्या केले आहे. अर्थात आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे प्र्त्यक्ष सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कथा कळेल शिवाय चित्रपट सांगून पाहण्यापेक्षा आधीच पहा
दिलीप प्रभावळकर – वयाला हरवणारा अभिनय आणि सोबतची दमदार स्टार कास्ट
दिलीप प्रभावळकर यांचं वय ८१ असलं तरी त्यांचा अभिनय तरुणाईलाही मागे टाकणारा आहे.मुख्य भूमिकेसोबत त्यांनी काही धाडसी स्टंट साकारले असून त्यातून त्यांचा समर्पणभाव दिसून येतो.या चित्रपटात अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी काम केले आहे त्या मध्ये आहे मराठी हिंदी चित्रपट निर्माते ,अभिनेते महेश मांजरेकर जे एका पोलिस अधिकार्याची भूमिका साकारत आहेत ,सिद्धार्थ मेनन अजून एक सिनेमाचा अविभाज्य भाग बाबूल मिस्त्री यांच्या मुलाच्या भूमिकेत ,प्रियदर्शनी त्याची प्रेमिकेच्या भूमिकेत दिसणार आहे शिवाय अभिनय बेर्डे सुद्धा या सिनेमात दिसणार आहे ,सुनील तावडे , दिग्गज अभिनेते भरत जाधव ,रवी काळे ,विजय केंकरे ,आरती वाडगबाळकर अशी तगडी स्टार कास्ट आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे



बॉक्स ऑफिस वर दशावतार ने केली दमदार कमाई
चित्रपटाची कथा पाहता या चित्रपटाला भरघोस यश मिळणार होत चांगल्या कथानकाच्या आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली सलग तीन दिवस हाउस फुल्ल असलेल्या या चित्रपटाने आत्ता पर्यंत ५ कोटी चा अंदाजित आकडा पार केला आहे ही एक मराठी सिनेमाच्या यशाच्या पुढच पाऊल म्हणावं लागेल तसेच हा चित्रपट असाच चालत राहिला तर नक्कीच हा १०० कोटी चा आकडा नक्की पार करेल ही आपल्या साठी सुद्धा एक अभिमानाची बाब असणार आहे
तुम्ही सर्वांनी हा सिनेमा चित्रपट ग्रहात जाऊन पहा ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी https://bookmyshow.com/ वर जाऊन आल्या जवळच्या सिनेमा ग्रहाचे तिकीट बुक करा
