मराठी चित्रपट अपडेट: मराठी चित्रपट सध्या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रेक्षकांना वळवण्यात यशश्वि झालेले दिसत आहे. या आठ वड्यात दोन मराठी चित्रपट रिलीज प्रदर्शित झाले आहे सर्व सिनेमाघरा मध्ये. “गुलकंद” आणि “आता थांबायच नाय” हे दोन चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाले आहेत या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुलकंद मध्ये आपण सई ताम्हणकर सोबत सामीर चौघुले प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
गुलकंद एक हलकीफुलकी प्रेम कहाणी सोबत धम्माल मस्ती आणि फुल्ल कॉमेडी
गुलकंद हा चित्रपट सर्व सिनेमा ग्रहात प्रदर्शित झाल्या असून एक चांगला प्रतिसाद या सिनेमाला मिळत आहे. एक वैवाहिक जीवनावर व त्यातील घडामोडीवर विवाह भाह्य मजेदार संबधावर एक वेगळीच प्रेम कथा सांगणारा हा चित्रपट आहे आणि एक वेगळी प्रेम कथा पहाण्यासाठी नक्की हा चित्रपट पाहावा या चित्रपटात जबरदस्त कॉमेडी आहे. प्रेक्षक या चित्रपटाचे रिव्युव देताना संगितले आहे संपूर्ण चित्रपट हा हसवणारा तसाच प्रमुख काथे पासून न भरकटणारा आहे.
महाराष्ट्राची हास्य जत्रेचे कलाकार दिसणार गुलकंद मध्ये धमाल करताना पाहूया कोण कोण आहे या चित्रपटाचा भाग
सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतभर लोकप्रिय झालेला कार्यक्रम म्हणजे “महाराष्ट्राची हास्य जत्रा”! या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, विनोदबुद्धी आणि संवादफेक हीच या यशामागची खरी ताकद आहे.
आता याच हास्यजत्रेतील काही खास कलाकार, लेखक, आणि दिग्दर्शक आपल्यासमोर घेऊन आले आहेत एक भन्नाट विनोदी आणि हृदयस्पर्शी चित्रपट — “गुलकंद”
या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते हे सगळेच महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे भाग असून त्यांनी छोट्या पडद्यावर मिळवलेल्या यशाला मोठ्या पडद्यावरही तितक्याच दमदार पद्धतीने साकारले आहे.
गुलकंद ही केवळ कथा नाही, तर ती आहे आपल्या ग्रामीण जीवनशैलीची, हास्याची, आणि सच्च्या माणुसकीची गोष्ट — जी हास्य आणि भावनांचा सुंदर मिलाफ आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत नवचैतन्याची चाहूल – एकापाठोपाठ एक हिट मराठी चित्रपटा साठी आले सुगीचे दिवस
गेल्या काही काळात मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार सिनेमांची उणीव जाणवत होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. या पार्श्वभूमीवर, चित्रपटसृष्टीसमोरचं मोठं आव्हान म्हणजे प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम पुन्हा मिळवणं होतं.
या दृष्टीने 2025 हे वर्ष सकारात्मक ठरत आहे. वर्षाच्या सुरुवातीला “चिकी चिकी बूम बूम” आणि “देवमाणूस” सारख्या चित्रपटांनी सुरुवात केली, ज्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. आता मे महिन्यात प्रदर्शित झालेला “आता थांबायचं नाय” हा सिनेमा एका वेगळ्याच विषयाला हात घालतो. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आणि आशुतोष गोवारीकर यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. आणखी एक सिनेमा ज्याची आपण चर्चा करत आहोत तो म्हणजे गुलकंद एक कॉमेडी चित्रपट आपणास पाहायला मिळणार आहे शिवाय या चित्रपटात सई तामनकर ,प्रसाद ओक ,समीर चौघुले ,हे दिसणार आहेत
उत्तम कथा, संगीत आणि दमदार अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा बहरताना दिसते आहे
या चित्रपटचा ट्रेलर पाहूया चला
.
“गुलकंद” – हास्याच स्फोट, मजेशीर कथानक आणि तगडी स्टारकास्ट!
मराठी प्रेक्षकांसाठी हलकाफुलका आणि मनाला प्रसन्न करणारा विनोदी सिनेमा गुलकंद लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केलं असून, कथा, पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी सचिन मोटे यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
चित्रपटात सई ताम्हणकर ही प्रमुख नायिका असून, विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले समीर चौघुले पहिल्यांदाच लीड रोलमध्ये झळकणार आहेत. ते सईच्या नवऱ्याची भूमिका साकारत आहेत, आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना निश्चितच हसवणार आहे. याशिवाय, हास्यजत्रा मधील प्रसाद औक, ईशा दे, आणि वनिता खरात यांसह अनेक लोकप्रिय कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत – त्यामुळे हास्याची लाट प्रेक्षकांवर निश्चितच येणार आहे.



गुलकंद हा सिनेमा एवरेस्ट एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. संगीताची जबाबदारी अविनाश–विश्वजीत आणि अमीर हदकर यांनी सांभाळली असून, गाणी आधीच सुपरहिट ठरली आहेत. अवधूत गुप्ते, रोहित राऊत, आशीष कुलकर्णी, वैशाली सामंत, आनंदी जोशी आणि सावनी रवींद्र यांसारख्या नामवंत गायकांनी ही गाणी गायली आहेत.
संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासाठी योग्य, हसवणारा आणि मनाला भिडणारा गुलकंद हा सिनेमा निश्चितच मराठी चित्रपटसृष्टीत एक आनंददायी भर ठरेल
प्रेक्षाच्या पसंतीस गुलकंद पाहिल्याच आठवड्यात केली चांगली कमाई
गुलकंद या चित्रपटाने पाहिल्याच आठवड्यात चांगली कमाई केली आहे शिवाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे आता पर्यन्त या चित्रपटाने 3 करोड चा आकडा पार केला आहे आणि अजून ही हा चित्रपट चांगली कमाई करेल असे दिसत आहे
गुलकंद हा सिनेमा पहाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग साठी खाली लिंक दिलेली आहे नक्की बघा