Devbhabhli: मराठी नाटक के जगातील सर्वात मोठ व्यासपीठ आहे नवनवीन विषयाला हात घालण्यासाठी आणि नवनवीन कलाकार निर्माण करणाय साठी “देवबाभळी”एक संगीतमय प्रवास हे नाटक सद्या सर्वात ज्यास्त चर्चेचा विषय ठरला आहे.हे नाटक प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे .मराठी नाटक हे एक वरदान ठरलं आहे.या नाटकाची लोकप्रियता एवढी झाली आहे की बॉलीवूड चे कलाकार सुद्धा या नाटकाच्या प्रेमात पडले आहेत नुकत्याच एका मुलाखतीत परेश रावल यांनी या नाटका बद्धल नाटकातील अभिनया बद्धल खूप चांगले शब्ध बोलले.
देवबाभळी एक संगीतमय प्रवास
“देवबाभळी” या नाटकाची एक विशेषता म्हणजे ते देवभक्ती आणि भक्तीतील नात्याचा एक सुगंधी गजरा प्रेक्षकांसमोर मांडते. नाटक पाहिल्यानंतर याचा ठसठशीत प्रत्यय येतो. “देवबाभळी” हे जीवंत संगीताने सजलेले (Live Music असलेले) नाटक आहे. विशेष म्हणजे या नाटकात केवळ दोनच पात्रे आहेत, तरीही पूर्ण दोन तासांची कहाणी अत्यंत प्रभावीपणे सादर केली आहे. ही कथा, तिची मांडणी आणि सादरीकरण हे सर्व निश्चितच उल्लेखनीय आहे.”
चला जाणून घेवूया या अप्रतिम नाटकाचे लेखक दिग्दर्शक आणि विशेषत प्रमुख पात्र या बद्धल
“देवबाभळी” हे नाटक सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. या भावपूर्ण नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख आहेत. त्यांच्या उत्तम लेखन आणि दिग्दर्शनाच्या जोरावर अनेक मान्यवर कलाकार देखील या नाटकाच्या प्रेमात पडले आहेत.
नाटकाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे — हे संपूर्ण नाटक केवळ दोन पात्रांवर आधारित असूनही, त्यामध्ये कुठेही कमीपणा जाणवत नाही. उलटपक्षी, या दोन पात्रांच्या सशक्त अभिनयामुळे आणि कथनशैलीमुळे संपूर्ण कथानक प्रभावीपणे उभं राहतं.
या संगीतमय नाटकाचा अविभाज्य भाग म्हणजे मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते. त्यांनी केवळ अभिनयच केला नाही, तर संगीताची थेट साथही दिली आहे. विशेष म्हणजे या नाटकात एकही रेकॉर्डेड गाणं नाही; सगळी गाणी लाइव्ह गायली जातात, त्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती मिळते.

देवबाभळी या नाटकाची कथा ही माऊली रखुमाई आणि संत तुकाराम यांच्या पत्नी आवली यांच्या मधील काव्य संगीता वर आधारित कथा आहे
“पंढरीचा विठुराया आणि संत तुकाराम यांच्यातील अतूट भक्तीचा संगम, आणि त्यातूनच उलगडणारी एक प्रेमळ, हळवी गोष्ट – माऊली रखुमाई आणि तुकाराम महाराजांच्या पत्नी यांच्यातील नात्याची. ही केवळ भक्तीची कथा नाही, तर विश्वास, समर्पण आणि स्त्रीहृदयाच्या गूढ भावनांचीही एक अपूर्व मांडणी आहे.”
देवबाभळी नाटकमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे
पंढरीचा पांडुरंग आणि संत तुकारामांची भक्ती सर्वश्रुत आहे. तुकोबाराय हे विठ्ठलाचे परमभक्त! परंतु त्यांच्या अखंड भक्तीत त्यांची पत्नी – आवली – वारंवार एकटी पडते. घराची जबाबदारी, संसाराची ओढ, आणि पतीची विठ्ठलभक्तीतली तन्मयता… यामध्ये ती एकटीच भरकटते.
आवली गरोदर असतानाही तिच्या मदतीला कोणी नसते – तुकोबा विठ्ठलध्यानात मग्न असतात. आणि तेव्हाच, तिच्या वेदनेला प्रतिसाद देण्यासाठी विठ्ठल आपल्या रखुमाईसह तिच्या मदतीस धावून येतो. याच क्षणापासून सुरू होतो एक अद्भुत, संगीतमय नाट्यप्रवास – जिथे आवली आणि रखुमाई दोघी मिळून पांडुरंगाच्या भक्तीतील कथा उलगडतात, प्रश्न विचारतात आणि त्यातून उत्तरंही शोधतात.

ही केवळ भक्तीची नव्हे, तर स्त्रीहृदयाच्या समजुतीची आणि नात्यांतील संवेदनशीलतेची गाथा आहे
परेश रावल यांनी देवबाभळी नाटकाची केली प्रशंशा सोबत मराठी इंड़स्ट्री मध्ये खूप मोठ कलाकार आहेत हे बोलले
“देवबाभळी” या संगीतमय नाट्यप्रवासाला मिळालेल्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते परेश रावल यांनी एका टीव्ही मुलाखतीत या नाटकाचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी “देवबाभळी” विषयी बोलताना म्हटलं:
“हे केवळ एक नाटक नाही, ही एक भावना आहे – एका भक्ताची आणि एका पत्नीची. आणि या भावनेला पूर्णत्व देतं त्याचं संगीत – जे संपूर्णपणे ‘लाईव्ह’ आहे. यात कुठेही रेकॉर्डिंग नाही, आणि हीच या नाटकाची खरी ताकद आहे.” सोबत त्यांनी आणखी एक विधान केले की कदाचित आम्ही अस काही गुजराती मध्ये करू शकू
त्यांनी नाटकातील संगीत, अभिनय आणि एकूण सादरीकरणाची मनापासून प्रशंसा करताना मराठी रंगभूमी आणि कलाकारांचं विशेष कौतुक केलं.
“देवबाभळी” आता केवळ एक नाटक न राहता, एक हृदयाशी भिडणारं अनुभव बनलं आहे – जे प्रेक्षकांप्रमाणेच मान्यवर कलावंतांनाही भावत आहे.”
मराठी चित्रपट व नाट्य ग्रहाच एक मोठ नाव ज्यांनी नुकताच या नाटकाचं प्रयोग पहिला डॉ श्रीराम लागू यांनी सर्व कलाकारांचे मनभरुण कौतुक केले व आशीर्वाद दिला डॉ. लागू त्याच्या पत्नी सह हा संगीतमय देवबाभळी चा आनंद घ्यायला आले होते नाटकाचा प्रयोग संपल्यावर त्यांनी मनसोक्त कलाकारान सोबत
नसृधीन शहा नाना पाटेकर या सारख्या दिग्गज कलाकारांनी काय बोलल आहे जाणून घेवूया
सद्य सर्वत्र चर्चा चालू आहे ” संगीत देवबाभळी “या नाटकाची बर्याच वर्षा नंतर एक अस नाटक जे अनेक दिग्गज्याच्या पसंतीस पडत आहे. नुकताच या नाटकाच्या प्रयोगाला हिन्दी चित्रपटाचे जेष्ठ कलाकार नसरुधहीन शाह यांनी भेट दिली सोबत या नाटकाचे कलाकार आणि लेखक दिग्दर्शक व संपूर्ण टिम ल भेटून त्यांना शुभेच्या दिल्या
मराठी हिन्दी चित्रपटा तिल एक मोठ नाव म्हणजे नाना पाटेकर यांनी ही या नाटकाच्या टिम ला भेटून शुभेच्या दिल्या आहेत एक वेगळा अनुभव पाहायला ऐकायला मिळाला म्हणून सगळ्यांचे आभार मानले
काय कसला विचार करताय नाटक पहायला जायचं की नाही आरे नक्की जा या साथी ऑनलाइन बूकिंग सुद्धा आहे खाली या नाटकाचे पुढील प्रयोग कुठे आणि कधी आहेत या बद्धल माहिती दिली आहे
[…] मराठी नाट्य कलेचे देव मानले जाणारे डॉ.… […]