मराठी कलाकार : मराठी चित्रपटसृष्टीत जेव्हा विनोद, ग्रामीण बोलीभाषा आणि प्रचंड लोकप्रियता यांचा विषय निघतो, तेव्हा पहिलं नाव डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे दादा कोंडके. एकाच वेळी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, निर्माता आणि गायक असलेले दादा कोंडके हे मराठी मनोरंजनविश्वातील एक अभूतपूर्व व्यक्तिमत्त्व होते. ज्यांनी अनेक काळ मराठी चित्रपट सृष्टी साठी सुगीच दिवस आणले ते म्हणजे दादा कोंडके
दादा कोंडके यांचा प्रभाव आजही मराठी सिनेमा आणि विनोदावर आहे.
चित्रपटाची सुरुवात कशी झाली?
त्यांच्या कारकिर्दीत दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन जिंकले.
त्यांचं योगदान दादा कोंडके यांच्यासाठी असामान्य मानलं जातं.
दादा कोंडके यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईतील नाईक वाडी, गिरगाव येथे झाला. त्यांचं खरं नाव कृष्णा कोंडके. सुरुवातीला ते एका इलेक्ट्रिक कंपनीमध्ये काम करत होते. परंतु त्यांना लावणी, तमाशा आणि लोककलांचं फार आकर्षण होतं. त्यांच्या विनोदी शैलीमुळे त्यांनी स्टेजवर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
दादा कोंडके यांची संवादशैली अद्वितीय होती.
“विच्छा माझी पुरी करा” हे नाटक त्यांचं पहिलं मोठं यश ठरलं. याच नाटकामुळे त्यांना रुपेरी पडद्यावर यायची संधी मिळाली आणि मग त्यांच्या चित्रपटांचा प्रवास सुरु झाला.

चित्रपट दिग्दर्शन आणि लेखन
त्यांच्या चित्रपटांनी दादा कोंडके यांची ओळख निर्माण केली.
प्रेक्षकांसाठी दादा कोंडके यांचे चित्रपट म्हणजे एक आनंददायी अनुभव होता.
गायक म्हणूनही दादा कोंडके यांनी अनोखी ओळख निर्माण केली.
दादा कोंडके यांनी स्वतःच्या शैलीत चित्रपटांची कथा आणि पटकथा लिहून अनेक हिट चित्रपट दिले. “सोंगाड्या”, “पांडू हवालदार”, “राम राम गंगाराम” हे त्यांच्या प्रमुख चित्रपटांपैकी आहेत. त्यांच्या संवादांमध्ये दोन अर्थाने बोलण्याची खास शैली प्रेक्षकाना खूप भावायची.

अभिनय क्षेत्रातील प्रवास
आधुनिक कलाकारांसाठी दादा कोंडके यांचे कार्य प्रेरण आहे.
दादा कोंडके यांनी आपली एक खास शैली विकसित केली होती – ग्रामीण पार्श्वभूमी, सडेतोड संवाद, आणि दुपारक्या (डबल मिनिंग) विनोद! त्यांच्या चित्रपटांचे संवाद आजही लोक मुखोद्गत सांगतात. तामडी माती पासून चालू झालेला प्रवास मध्ये त्यांचा पहिला चित्रपट “सोंगाड्या” (१९७१) होता, जो प्रचंड गाजला. त्यानंतर आलेले चित्रपट – पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या, एकटा जीव सदाशिव , आंधळ मारतो डोळा, तुमचं आमचं जमलं, चंदूजामदार – हे सगळे हिट ठरले.आज ही त्याचे चित्रपट हे मराठी चित्रपट वाहिनी वर दाखवले जातात
त्यांच्या चित्रपटांमध्ये विनोदाबरोबरच समाजाचं चित्रण आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन असायचं. प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांतून खळखळून हसणं आणि काही शिकणं दोन्ही मिळायचं. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात एक महत्वाचा संदेश असायचा आणि त्या पुरक चित्रपट हा ते बनवायचे
गायक आणि निर्माता
दादा कोंडके हे एक अष्टपैलू खेळाडू आपण म्हणू शकतो असे ते होते यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांचा आवाज, ग्रामीण लहेजा आणि खमका उच्चार गाण्यांना एक वेगळीच ऊर्जा देत असे. त्यांनी स्वतःची Kondke Films नावाची निर्मिती संस्था सुरु केली आणि ती अत्यंत यशस्वी ठरली.
हिंदी चित्रपटांमध्येही दादा कोंडके यांची छाप स्पष्ट दिसते.
त्यांचे अंतिम क्षण सुद्धा दादा कोंडके यांच्याबद्दल बोलतात.आजही दादा कोंडके यांचा वारसा जिवंत आहे.
दादा कोंडके हे गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर होते
दादा कोंडके हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद असलेले पहिले मराठी कलाकार होते. त्यांच्या सलग ९ चित्रपटांनी ‘सिल्व्हर जुबिली’ (२५ आठवड्यांपेक्षा अधिक काळ चालणं) पूर्ण केली होती. ही गोष्ट आजही अभिमानाने सांगितली जाते.दादा कोंडके यांनी गिनीज बुकमध्ये स्थान मिळवले.
दादा कोंडके यांचे बाळा साहेब ठाकरे यांच्या सोबतचे जवळचे संबंध
दादा कोंडके हे त्यांच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत राहणारे मराठी कलाकार होते. त्यांच्या चित्रपटांमधील डबल मिनिंग संवाद, ग्रामीण भाषाशैली आणि खुसखुशीत विनोदामुळे ते प्रचंड गाजले. अशा या कलाकाराला बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम आणि पाठिंबा लाभला हे काही वावगं ठरणार नाही.
त्या काळात मराठी चित्रपटांना थेटरमध्ये पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता. अशा परिस्थितीत बाळासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन थेटरमालकांशी बोलून मराठी चित्रपटांचे शो सुरू केले. इतकंच नव्हे तर मराठी चित्रपटांना व्यासपीठ मिळावं यासाठी विशेष समितीचीही स्थापना करण्यात आली. या समितीतून मराठी सिनेसृष्टीला एक नवा हातभार लागला.

दादा कोंडके आणि बाळासाहेब यांचं नातं यानंतर केवळ कलात्मक राहिलं नाही तर ते एक विश्वासाचं आणि मैत्रीचं नातं बनलं. दादा कोंडके यांनी अनेक वेळा शिवसेनेच्या जाहीर सभा आणि रॅलींमध्ये भाषणंही दिली. आजही त्यांच्या त्या भाषणांचे ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर ऐकायला मिळतात
Oneplus Nord 5 अब भारतीय बाजार मे क्या कीमत रहेगी जानिये ओर क्या specification रहेंगे
दादा कोंडके यांनी हिंदी सिनेमातही आपला ठसा उमटवला
फक्त मराठी नव्हे तर दादा कोंडके यांनी हिंदी चित्रपटातही आपली छाप सोडली. “आगे की सोच”, “तेरे मेरे बीच में” यासारख्या चित्रपटांतून त्यांनी हिंदी प्रेक्षकांनाही वेगळा विनोद दिला. स्वतः अभिनय करून दिग्दर्शन केले शक्ती कपूर सारख्या अभिनेत्या बरोबर त्यांनी काम केले मात्र, त्यांचं हृदय नेहमीच मराठी चित्रपटासाठी धडपडत राहिलं.
जिवनाच्या शेवटच्या क्षनाची आठवण
दादा कोंडके यांचं निधन १४ मार्च १९९८ रोजी मुंबईत झालं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. आजही त्यांचे चित्रपट, संवाद आणि गाणी प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.दादा चे चित्रपट आज ही लोक प्रेक्षक पसंती राहिली आहे .मराठी अमराठी प्रेक्षक हे दादां कोंडके याच्या फिल्म ची वाट पायाचे
त्यांनी दिलेला वारसा आजच्या कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या शैलीतून विनोदाला नवसंजीवनी मिळाली आणि मराठी सिनेमा घरोघरी पोहोचला.
तुमचा आवडता दादा कोंडकेचा संवाद किंवा चित्रपट कोणता?
🔹 दादा कोंडकेसारखे कलाकार आजही मराठीत तयार होतायत का?
कमेंट करून आम्हाला नक्की कळवा! असच मराठी दिग्गज कलाकार बद्दल माहिती साठी आमच्या सोबत रहा funmediamarthi.com