संपूर्ण महाराष्ट्राच्या आवडत्या शो “बिग बॉस मराठी” चा नवीन सीझन आता सुरू झाला आहे. प्रेक्षकांनी यंदा कोणत्या स्पर्धकांची मजा घ्यायची आहे, त्याचे चर्चा जोरात सुरु आहेत. या सीझनमध्ये कोणते खास स्पर्धक सहभागी झाले आहेत, कोणाचे खेळ किती जोरदार आहेत आणि कोणाच्या नाटकांनी घरात खळबळ उडवली आहे याबद्दल जाणून घेऊ या.
नवीन स्पर्धकांची ओळख
या वर्षीच्या सीझनमध्ये अनेक नामांकित चेहरे आणि काही नवखे चेहरेही सहभागी झाले आहेत. प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ते आणि इन्फ्लुएन्सर्स यांचा संगम घरात दिसत आहे. प्रत्येकाचा आपला खास अंदाज आणि खेळ खेळण्याची पद्धत आहे. प्रत्येकजण आपल्या ताकदीने खेळ खेळत आहे आणि प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
बिग बॉस मराठी सीझन 5 आज पर्यन्त चा सर्वात ज्यास्त लोकप्रिय शो ज्याचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करत आहेत,लोकप्रिय सदस्य या वेळी पाहायला मिळालेत,जे या बिग बॉस मराठी च्या घरं मध्ये धुमाकूळ घालत आहेत.
कोण आहेत बिग बॉस मराठी सीझन 5 स्पर्धक: काय आहे त्यांची पार्श्वभूमी जाणून घेऊया
बिग बॉस मराठी सीझन 5 ने या वेळी प्रेक्षकसाठी एक वेगळीच भेट आणली आहे ती म्हणजे या वेळचे या घराचे सदस्य , या घरातील प्रत्येकाची स्वतःची अनोखी ओळख आहे प्रत्येक जन आपआपल्या क्षेत्रात अग्रगण्य आहे. आणि याच कारणास्तव या वेळ चा खेळ सर्वांना आवडत आहे ,संपूर्ण भारतभर हा शो पहिला जात आहे.
वर्षा उसगावकर
वर्षा उसगावकर या एक दिग्गज अभिनेत्री आहे ज्यांनी आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टी गाजवली आहे. एक उत्कृष्ठ अभिनेत्री, उत्कृष्ट नृत्य कलाकार म्हणून वर्षाताई संपूर्ण देशात मानल्या जातात.मराठी अभिजात आणि बॉलीवूड चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी, वर्षा ताई 80 च्या दशकाच्या मनोरंजन विश्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत.मराठी चित्रपट मालिका मध्ये त्यांनी खुप काम केले आहे त्यांचा अनुभव आणि लोकप्रियता बिग बॉसच्या घरासाठी महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आहे.
अभिजीत सावंत
भारतातील इंडियन आयडॉलचा या शो चा पहिला विजेता अभिजीत सावंत हा एक उत्तम गायक आहे ज्याने आपल्या गोड आवाजाने भारतभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याच्या विजयानंतर, त्याने अनेक यशस्वी अल्बम आणि सिंगल्स रिलीझ केले आणि स्वतःला भारतीय संगीत उद्योगातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून स्थापित केले.अभिजित ने अनेक मराठी व हिंदी चित्रपटांसाठी सुद्धा गाणी गायली आहेत.अभिजित एक उत्कृष्ठ गायक आहेच त्या बरोबर एक चांगला माणूस सुद्धा आहे.बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये अभिजीतच्या प्रवेशामुळे शोमध्ये संगीत क्षेत्रातील एक दिग्गज पुन्हा एकदा महाराष्ट्राला व संपूर्ण देशाला पाहायला मिळणार आहे.
निक्की तांबोळी
निक्की तांबोळीही एक लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जिने बिग बॉस हिंदीमध्ये तिच्या कार्यकाळापासून प्रसिद्धी मिळवली. राखी सावंत सोबत बरोबर होणारे तिचे भांडण लोकांनी खुप एन्जॉय केलं ,तिच्या बोल्ड व्यक्तिमत्वासाठी आणि आकर्षक लूकसाठी ओळखल्या जाणाऱ्या निक्कीने विविध दक्षिण भारतीय चित्रपट आणि हिंदी टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. मराठी बिग बॉस 5 मध्ये तीन तुफान राडे चालू केले आहेत.सिजन 5 च्या पहिल्या आठवड्यात निक्की चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
पंढरीनाथ कांबळी
एक हरहुन्नरी अभिनेता ज्यांनी अनेक मराठी चित्रपट नाटक व कॉमेडी शो केलेले आहेत. गंगुबाई नॉन मॅट्रीक जी लोकप्रियता त्यांनी आपल्या अभिनयाने वाढवली अनेक मराठी चित्रपटात कॉमेडी करणारे पंढरीनाथ कांबळे आता बिग बॉस मराठी 5 चां भाग आहेत.शांत व विनोदी स्वभावा मुळे ते बिग बॉस च्यां या घरात आपलं अस्तित्व टिकवून ठेवतील शेवट पर्यंत असा विश्वास सर्वांना आहे.
जानव्ही किल्लेकर
जानव्ही एक मालिका अभिनेत्री आहे तिने ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘आई माझी काळूबाई’, ‘श्री गुरुदेव दत्त’ या मराठी मालिका मध्ये अभिनय केला आहे. आणि आताच्या बिग बॉस मराठी5 ची सर्वात भांडखोर परखड आणि रितेश देशमुख यांच्या नुसार बेशिस्त आशी तिची ओळख गेल्या काही दिवसात झाली आहे
अरबाज पटेल
अरबाज पटेल हा एक मॉडेल आहे त्याने अनेक ब्रँड साठी मॉडेलिंग केले आहे तसेच तो हिंदी रिल्स बनवतो त्याचे Instagram v facebook var खुप फॉल्लोवर आहेत तसेच तो Split Willa स्पील्ट विल्ला या हिंदी रियालिटी शो मध्ये या आधी दिसला होता
धनंजय पवार
धनंजय एक व्यावसायिक आहे त्यांचा होम फर्निचर चां व्यवसाय आहे. धनंजय यांना अभिनयाची आवड आहे त्यांचा छोट्या छोट्या रील पासून झालेला प्रवास त्यांना बिग बॉस मराठी 5 च्या घरापर्यंत घेऊन आला आहे.आणि या घरात ते उत्तम प्रकारे कॉमेडी करत बाकी सदस्यांची मजा घेत खेळत आहेत.
अंकिता वालावलकर
अंकिता ला लोक “कोकण हार्ट गर्ल” म्हणून पण ओळखतात कोकणातून आपली कोकणी भाषा कशी आहेत कोकणी लोक कशे आहेत यांचा प्रवास सांगत ते एक व्यावसायिक आसा तिने प्रवास केला आहे तिने ही आधी रिल पासून सुरू केलेला प्रवास आज तिला एक मार्गदर्शक पर्यंत पोचवू शकला आहे आणि आता बिग बॉस च्या घरामध्ये अंकिताने आपली एक A टीम बनवली आहे
सूरज चव्हाण
अत्यंत गरिबीतून आलेला सूरज आधी टिक टॉक साठी व्हिडिओ बनवायचा त्या नंतर ते भारतात बंद करण्यात आले त्या नंतर त्याने फेसबुक Instagram वर रिलं बनवणे चालू केलं लोकांना त्याचे रिल् खुप आवडतात.बिग बॉस मराठी 5 या सीजन मध्ये प्रेक्षकांना सूरज ला जास्त पसंत दिली आहे
घनश्याम दारोडे
घनश्याम एक पदवीधर असून त्याला “छोटा पुढारी” या नावाने संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये ओळखले जाते.घनश्याम याने आनेक राजकीय नेत्या समोर भाषण केले आहे त्याचे भाषण कौशल्य खूप छान आहे आणि तो शेतकर्याचे नेहमी प्रश्न मांडत असतो.बिग बॉस मराठी च्या या पाचव्या सीझन चा तो भाग आहे उत्तम प्रकारे खेळत आहे मूर्ति लहान पण किर्ती महान ही नक्कीच म्हण त्याच्या साथी लागू होऊ शकते ,घनश्याम आता बिग बॉस च्या घराबाहेर गेला आहे
आता आहे वाइल्ड कार्ड प्रवेश कोन आहे ज्याला मिळणार आहे घर प्रवेश
बिग बॉस च्या घरात आत्ता होणार आहे एक अशा व्यक्तीची एन्ट्री जी पडणार आहे सर्वांना भारी. फिटनेस च्या दुनियेतील बादशाह ज्याच्या नवे अनेक रेकॉर्ड आहेत आणि ज्यांनी भारतासाठी परितोषक मिळवले आहे त्या नवीन सदस्या चे नाव आहे संग्राम चौघुले जो येणार आहे आज पासून च्या भागा मध्ये आता फुल्ल राडा आणि निक्की आणि अरबाज च माज नाककी उतरवणार संग्राम
सुरुवातीचे दिवस
घरातल्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच स्पर्धकांमध्ये झगडे, मैत्री आणि मतभेद दिसायला लागले आहेत. सुरुवातीच्या टास्कमधून कोणाची मनाची ताकद किती आहे, कोण किती स्फूर्तिदायक आहे आणि कोण किती सामर्थ्यवान आहे हे स्पष्ट झाले आहे. घराच्या कॅप्टन्सीची पहिलीच लढाई खूपच रंगली होती, ज्यामुळे पहिल्या आठवड्यात
[…] […]