मराठी मनोरंजन विश्व:मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय आदरणीय आणि लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांना भारत सरकारने 2025 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. हास्याच्या दुनियेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या या कलाकाराने गेली अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या या राष्ट्रीय सन्माना मुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.आज प्रत्येक मराठी अमराठी जे अशोक सराफ यांचे चाहते आहेत त्यांना आनंद झाल
मराठी हास्यसृष्टीचा सम्राट आता पद्मश्री पुरस्काराने गौरवलेला चला थोडक्यात जाणून घेऊया त्यांचा इथपर्यंत चा प्रवास
मराठी रंगभूमीचा अभिमान अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबई येथे झाला. अशोक मामा लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने त्यांनी रंगभूमीवर अभिनय सुरू केला. सुरुवातीला अनेक प्रयत्न अभिनय क्षेत्रात केले काही नाटकांमध्ये लहान भूमिका केल्यानंतर त्यांची एक वेगळी ओळख,प्रतिभा लोकांच्या नजरेस आली. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी नाटके आणि चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

ज्या काळत दादा कोंडके, रमेश देव असे दिग्गज कलाकार मराठी चित्रपट सृष्टी टिकून रहावी या साठी प्रयत्न करत होते त्याच्या पुढच्या काळात अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ती कमान आपल्या आपल्या हाती घेतली होती 1970-80 च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत अशोक सराफ यांनी धमाल उडवून दिली. ‘अशी ही बनवा बनवी’, ‘धमाल भरी रात्र’, ‘घाबरायला काय झालं’, ‘एक डाव भूताचा’ या चित्रपटांनी त्यांना सुपरस्टार बनवलं. त्यांच्या हास्य शैलीला आणि कॉमिक टायमिंगला तोड नाही. म्हणूनच संपुर्ण महाराष्ट्र हा हास्यसम्राट म्हणून संबोधतो.
अशोक सराफ यांनी अनेक हिंदी चित्रपटा मध्ये सुद्धा काम केले आहे
आपले काम हे फक्त मराठीतच नव्हे, तर हिंदी सिनेमातही त्यांनी खास ठसा उमठवला. रोहित शेट्टी हा दिग्गज हिंदी चित्रपट दिग्दर्शक अशोक सराफ यांचा नेहमीच सन्मान करताना आपल्या ला दिसतो त्या मुळे त्याच्या सिनेमात अनेक वेळा आपल्या अशोक मामा यांना पाहायला मिळतं ‘सिंगम’, ‘यस बॉस’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कर्ज’, ‘गुप्त’ अशा अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी खलनायक, मित्र, वडील अशा विविध भूमिका साकारल्या. त्यांचा सहज अभिनय आणि लोकांशी जोडणारी शैली ही त्यांची खास ओळख ठरली.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच त्यांना देण्यात आला होता आता अजुन एका पुरस्काराचे मानकरी ठरले
हास्यसम्राट अशोक सराफ यांना नुकताच “महाराष्ट्र भूषण” या अत्यंत मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यानंतर पुन्हा एकदा अभिमानास्पद अशी बाब घडली आहे. अशोक सराफ यांना भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत, देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान “पद्मभूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पद्मश्री पुरस्कार – प्रतिभेची राष्ट्रीय पातळीवर पोचलेली दखल
2025 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या बहुआयामी अभिनय कारकिर्दीची आणि हास्यविश्वातील योगदानाची दखल घेतली. हा सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया देखील त्याच नम्रतेने भरलेल्या होत्या – “हा पुरस्कार संपूर्ण मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आहे, ज्यांनी मला इतकी वर्षं प्रेम दिलं.”
कौटुंबिक जीवन आणि साधा स्वभाव
अशोक सराफ यांचे वैयक्तिक आयुष्य देखील तितकेच सुंदर आणि साधं आहे . त्यांनी निवेदिता जोशी यांच्याशी विवाह केला आहे. त्यांना एक मुलगा आहे – अनिकेत सराफ, जो परदेशात सेटल आहे. सराफ यांचा स्वभाव अतिशय शांत, साधा आणि नम्र आहे. मोठमोठ्या स्टारडमनंतरही त्यांनी कधीही गर्व केला नाही, हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं खरे सौंदर्य आहे. अभिनय च्या जोरावर अनेकांच्या हृदयात जागा निर्माण केली आहे.
एक असा चेहरा ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला खळंखळून हसवल मराठी चित्रपट श्रुष्टीला पडत्या काळात तारले सोबत मित्रांची साथ मिळाली
एक काळ असा होता, जेव्हा मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवायला सुरुवात केली होती. त्या काळात जेव्हा सगळं धूसर वाटत होतं, तेव्हा हास्य आणि गुणवत्तेच्या जोरावर प्रेक्षकांना परत थिएटरकडे ओढून आणण्याचं अवघड पण अत्यंत महत्त्वाचं काम केलं — अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर या अफलातून चौकडीने!
त्यांच्या अफाट विनोदबुद्धीने, हृदयस्पर्शी अभिनयाने आणि खणखणीत परफॉर्मन्समुळे मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा फुलली — आणि आज आपण पाहतोय, त्याच मेहनतीचं फळ त्यांच्या गौरवाच्या रूपात मिळताना.
आज अशोक सराफ यांना “महाराष्ट्र भूषण” आणि “पद्मभूषण” या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे — ही केवळ त्यांची नव्हे, तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीची शान आहे

प्रेक्षकांचे लाडके आणि कलाकारांचे प्रेरणास्थान
अशोक सराफ हे एक चालत फिरतं कलामंदिर आहे. अनेक मराठी कलाकार यांच्या बोलण्यातून त्याच्या बद्दल चा आदर नेहमीच दिसतो. अशोक सराफ हे एक असे व्यक्ति महत्व आहे ज्यांचा आदर बॉलिवूड भाईजान सलमान खान सुद्धा करताना दिसतो धर्मवीर चित्रपटाच्या रिलीज वेळी आपण सर्वांनी ते पहिलं सुद्धा आहे
FunMarathiMedia.com तर्फे आशोक सराफ यांना मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
अशोक सराफ यांच्या पद्मश्री पुरस्काराची बातमी वाचून खरोखर आनंद झाला! त्यांच्या हास्यशैलीने आणि अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्यांच्या कामाची विविधता आणि सहजता हीच त्यांची खासियत आहे. 1970-80 च्या दशकातील त्यांच्या चित्रपटांनी मराठी सिनेमाला नवीन उंची दिली. हिंदी सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला, हे खूप गौरवाचे आहे. पद्मश्री हा पुरस्कार त्यांच्या कारकिर्दीला योग्य सन्मान आहे. पण मला एक प्रश्न पडतो, अशोक सराफ यांच्या सर्वात आवडत्या भूमिका कोणत्या आहेत आणि त्यांनी स्वतःला सर्वात जास्त आवडणारी भूमिका कोणती मानली आहे?