मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात आपल्या मराठी चित्रपटासाठी चांगलीच ठरली आहे आणि त्या हून सुंधर गोष्ट म्हणजे या चित्रपटाचा विषय आज क्रांतीज्योती विद्यालय हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पहिला जात आहे आणि तो प्रेक्षकांच्या पसंती सुद्धा पडत आहे हा केवळ एक चित्रपट नाही ही एक चळवळ आहे मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्यासाठीची
मराठी शाळा आता अनेक ठिकाणी बंद पडत आहेत विद्यार्थी अभावी
आज आपल्या महाराष्ट्रात अनेक मराठी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहे याचे मुख्य कारण आहे गावातील जीवन पद्धती आणि रोजगार , खेडेगावात रोजगार नसल्या कारणाने अनेक गाव ओसांड पडत आहेत लोक शहरी भागात स्थलांतरित होत आहेत शिवाय त्याच्या बरोबर त्यांची मुले त्यांचे कुटुंबिय सुद्धा स्थळांनातर करत आहे
आज स्थलांतरा मुळे मराठी शाळेची गण संख्या कमी कमी होत चालली आहे परिणामी अनेक शाळा बंद पडत आहेत या आपल्या मराठी शाळेत अनेक सुविधा देवून सुद्धा मुळे किवा त्यांचे पालक मराठी शाळेत आपल्या मुलांना घालत नाहीत
हेमंत डोमे यांनी महाराष्ट्रातील एक सवेदन शील विषयाला हात घातला आहे
“क्रांतीज्योती विद्यालय” या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत डोमे यांनी मराठी शाळेचा अतिशय सवेदन शील विषय घेतला आहे.आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी ही एक गंभीर बाब आहे की आपल्याच महाराष्ट्रात आपल्याला आपली मराठी भाषेसाठी तिच्या शिक्षणा साथी लढाव लागत आहे पूर्वी अनेक इतर जातीय लोक सुद्धा शहरी ठिकाणी मराठी शाळेत शिकली आहेत आसे अनेक उदाहरणे आहेत मुंबई सारख्या शहरात महानगर पालिकेच्या शाळे मध्ये पूर्वी अमराठी लोक सुद्धा शिकत होते आणि आता अशी अवस्था आहे की मराठी शाळेमध्ये पट संख्या ही कमी होत आहे आणि इंग्रजी माध्यम सीबीएससी आयसीएसई सारख्या शाळांना प्राधान्य देण्यात येत आहे
चित्रपटात दिग्गज कलाकारांनी आपली कला दाखवली आहे ती प्रेक्षकांच्या पसंती पडत ही आहे
या चित्रपटात मुख्य शिक्षकाची भूमिका मराठी हिन्दी तसेच अनेक भाषे मध्ये ज्यांनी काम केले आसे आपले मराठ मोळे कलाकार सचिन खेडेकर दिसणार आहेत शिवाय एक अवलिया विद्यार्थ्याची टिम या मध्ये दिसणार आहे त्यात प्रामुख्याने अमेय वाघ ,स्मार्ट सिद्धार्थ चांदेकर ,प्राजक्ता कोली क्षितिज जोग ,हरिष दुधाने ,कादंबरी कदम आणि पुष्कराज चिरपुतकर आणि या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे अशी मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील अनेक कलाकाराची हजेरी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे



क्रांतीज्योती विद्यालय ला मिळतोय प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद सोबत पाहिल्याच दिवशी भरगोस कमाई
क्रांतीज्योती विद्यालय एक शाळा वाचवण्यासाठी शाळेतील माजी विध्यार्थ्यानी केलेली धडपड या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.यात काही मजेशीर प्रसंग आहेत शिवाय आपण चित्रपट पाहताना नक्कीच आपल्याला आपल्या शाळेची आठवण येणार हे नक्की या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला नक्की कळेल या मध्ये कॉमेडी आहे थ्रिल आहे सुंदर गाणी आहे आणि एक सामाजिक संदेश आणि काळाची गरज हे आपल्याला नक्की पाहायला मिळेल
तुम्हाला तुमचं बालपनाचा आणि शाळा आनंद पुन्हा एकदा घ्यायचा आहे मग नक्की बघा
आपल्या आयुष्यात सगळ्यात सुवर्ण काळ असतो तो म्हणजे आपल बालपण आणि आपली पहिली शाळा या चित्रपटाचा फक्त ट्रेलर पाहुन सगळ्यांना आपली शाळा नक्की आठवली असेल आपण शाळेमध्ये किती मस्ती केली होती अभ्यास कसा केला खूप सार्या गोसठी आपल्याला नक्की आठवतील या बालपणीच्या सुवर्ण काळात आपली मैत्री ही कोणतीही अपेक्षा हीन होती.
मित्रांनो मी तर म्हणेन हा चित्रपट तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत पहाच पण या सोबत तुमच्या सोबत जे शाळेमध्ये शिकले आहेत त्याच्या सोबत पहा नक्की या चित्रपटाची मजा ही द्विगुणित होईल अनेक वर्षानी न भेटलेले मित्रा सुद्धा या निम्मीताने भेटतील एकदा प्रयोग करून पहा नक्की आवडेल सर्वांना
चित्रपटाची निर्मित आणि संगीत या बाबत चला जाणून घेऊया
क्रांतीज्योती विद्यालय चित्रपटाचे संगीत Harsh-Vijay या जोडीने (The Folk Aakhyan) दिले असून, ‘हाकामारी’, ‘शाळा मराठी’ यांसारखी गाणी मराठी शाळांचा संघर्ष आणि नॉस्टॅल्जिया प्रभावीपणे व्यक्त करतात
चित्रपटाचे Distribution ‘Chalchitra Mandalee’ आणि Sunshine Studios यांच्या बॅनर खाली बनले असून, digital आणि social media प्रमोशनसाठी Just Right Studioz Nx आणि It’s Social Time यांचा समावेश आहे.
चित्रपटाचे ऑनलाइन बूकिंग करण्यासाठी https://in.bookmyshow.com या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या शाळकरी मित्रासोबत या चित्रपटाचा अनुभव घ्या .
मराठी चित्रपट आणि मालिकांचे नाव नवीन अपडेट साठी आमच्या https://funmediamarathi.com/ भेट द्या
