मुंबई: आपण नेहमीच म्हणतो मराठी चित्रपट सृष्टी ही खूप मोठी आहे.ज्या चित्रपट जन्म भारतात एका मराठी माणसाने केला दादा साहेब फाळके त्यांनी निर्माण केलेली ही इंडस्ट्री आज जगात आपले नाव गाजवत आहे. ७१ वा राष्टीय चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आणि या पुरस्कार सोहळ्यात एक अभिमानास्पद गोष्ट घडली ती म्हणजे “नाळ २” चित्रपटील बाल कलाकारांना मिळालेला पुरस्कार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा
भारतीय सिनेमा साठी एक मानाचा पुरस्कार मानला जाणारा सोहळा नुकताच पार पडला या चे वैशिष्ट म्हणजे हा पुरस्कार स्वतः आपल्या देशाचे राष्ट्रपती यांच्या हस्ते देण्यात येतो आणि या वेळी याचे खास महत्व आहे आपल्या सर्वांसाठी मराठी सिनेमातील ४ बाल कलाकारांना या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्म आणि भारतीय सिनेमा कमिटी यांचा उपस्थित हा सोहळा पार पडला
पुरस्कार सोहळ्यात बालकलाकार त्रिशा ठोसर ने सगळ्याची मने जिंकून घेतली साडी घालुन चिमुकली ने पुरस्कार स्वीकारला
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्याचे विशेष भाग म्हणजे मराठी नाळ २ चित्रपटातील बाल कलाकार या सोहळ्यात त्रिशा ठोसर च्या साडीने सर्वांची मने जिंकुन घेतली विशेष म्हणजे पुरस्कार घेताना जो आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर होता तो खूप वेगळा होता एखाद्या मोठ्या कलाकाराला जमणार नाही असा तिचा आत्मविश्वास दिसून येत होता त्यात तिने जी सफेद रंगाची साठी नेसली होत त्यात ती अजून खूप गोड दिसत होती त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोळके, भार्गव जगताप यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार
मराठी चित्रपटात ४ बाल कलाकारांना राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात सन्मानित करण्यात आले तर एकाच हा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिमानाची बाब म्हणजे यंदा एकाचवेळी चार बालकलाकारांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या चिमुकल्यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षक आणि परीक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे यापैकी श्रीनिवास पोळके बालकलाकाराला यापूर्वीही राष्ट्रीय पुरस्कार 2020 मिळाला होता, त्यामुळे सलग दुसऱ्यांदा या मानाच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. एवढ्या लहान वयात दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणे ही निश्चितच प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कामगिरी आहे.
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात “नाळ २” चा डंका दिग्दर्शका सोबत ३ बाल कलाकारांना मिळाला सन्मान
“नाळ” या चित्रपटाचा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप सोडली की त्याचे नाव ऑस्कर नामांकनासाठीही पुढे गेले होते. त्या यशानंतर तब्बल सात वर्षांनी म्हणजेच 2025 मध्ये “नाळ २” प्रेक्षकांसमोर आला. दमदार कथा, ताकदीची स्टार कास्ट, आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय यामुळे या सिनेमाने केवळ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही, तर प्रेक्षकांचा विश्वासही जिंकला. शिवाय अप्रतिम संगीत आणि दिग्दर्शनाने चित्रपटाला एक वेगळंच वजन मिळालं. या सर्व घटकांचा सुंदर संगम झाल्यामुळे “नाळ २” ला यंदा थेट चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात



तसेच जिप्सी सिनेमातील कबीर खडारे बालकलाकाराला सुद्धा या वेळी पुरस्काराने त्याने पुरस्कार स्वीकारताना आपला मराठी बना जपलेला दिसत होता खाली धोतर आणि सदरा आसा पेहरावा करून त्याने हा सन्मान स्वीकारला
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यांनी केले होते तर प्रॉडक्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. जितेंद्र जोशी ,दीप्ती देवी असे अनेक दिग्गज कलाकार या मध्ये आहेत शिवाय या चित्रपटा मध्ये नागराज मंजुळे यांनी स्वता भूमिका केली आहे या तिल एक एक पात्र विशेष आहे


जीएसटी मध्ये झाले अनेक बादल पहा काय होणार स्वस्त आणि काय महाग 23 नोवेंबर पासून भारतात सर्वत्र लागू
बॉलीवूड बादशाह सर्वोत्कृष्ट अभिनेता और मल्याळम सुपर स्टार को विशेष दादासाहेब फाळके अवॉर्ड से किया सन्मानित
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार. हा पुरस्कार यावर्षी मल्याळम चित्रपटसृष्टीतील महानायक मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला. आपल्या दीर्घ कारकिर्दीत मोहनलाल यांनी असंख्य संस्मरणीय भूमिका केल्या आहेत. त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे आणि चित्रपटसृष्टीतील योगदानामुळे हा सन्मान त्यांना अधिक योग्य ठरतो.
या राष्ट्रीय सोहळ्यात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता तर राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या सन्मानाने गौरविण्यात आले. शाहरुख खानने अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याच्या अलीकडील चित्रपटांमधील दमदार भूमिकेमुळे त्याला हा पुरस्कार मिळाला.सोबत विक्रांत मेस्सी याला सुद्धा उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे
राणी मुखर्जी हिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि अप्रतिम अभिनयाचे फळ म्हणून तिला मिळालेला पुरस्कार हा बॉलिवूडसाठी अभिमानाचा क्षण आहे.
मराठी चित्रपट आणि मालिका यांचे उपडेट घेण्यासाठी पेज ला फॉलो करा
