Dharmendra Ji passed away.

मुंबई : बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील एक महानायक धर्मेंद्र देओल “हि-मॅन”यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेप्रेमी आणि कलाकारमंडळी दुःखात आहे. धर्मेंद्र हे केवळ एक सुप्रसिद्ध अभिनेता नव्हते, तर त्यांच्या अभिनयशैली, कर्तबगारी आणि व्यक्तिमत्वामुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जात.

धर्मेंद्र यांचे चित्रपट श्रुष्टि तिल पदार्पण आणि आज पर्यन्त गाजलेले सिनेमे

धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबच्या नसराली गावात झाला. त्यांचे खऱ्या नावाचे धर्मेंद्र कुमार देओल आहे. त्यांच्या वडिलांचा राज्य शिक्षण विभागात मुख्याध्यापकचा नोकर होता आणि धर्मेंद्र यांनी लुधियान्याच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तेव्हा चित्रपटसृष्टीत नाम कमावण्याचा त्याचा स्वप्न होता. धर्मेंद्र यांनी 1960 साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेका प्रकारचे रोल साकारले, परंतु त्यांचा भूमिकांतील ठळकपणा आणि चार्म, अ‍ॅक्शन सीनमध्ये त्यांची कामगिरी त्यांना ‘ही-मॅन’ हे टॅग दिले

धर्मेंद्र यांचे अभिनयाने बॉलीवुड इंडस्ट्री साठी अनेक हिट आणि बॉक्स ऑफिसवर गाजलेले चित्रपट दिले त्यातील काही निवडक . त्यांचा ‘शोले’ चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा आणि लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाने त्यांना अमरत्व दिले. त्याचबरोबर ‘फूल और पत्थर’, ‘सत्यकाम’, ‘प्रतिज्ञा’, ‘चुपके चुपके’, ‘राजा जानी’, ‘धर्मवीर’, ‘ड्रीम गर्ल’, ‘जुगनू’ आणि ‘यादों की बारात’ या चित्रपटांनी त्यांच्या कारकिर्दीला वेगळाच मुकाम दिला. त्यांनी विनोद गर्नार पासून ते गंभीर भूमिकांपर्यंतचे अनेक प्रकारचे रोल केले. त्यांच्या चित्रपटांच्या विविधतेमुळे ते अनेक प्रकारच्या प्रेक्षकांच्या मनावर बसा शकले.

हि-मॅन यांचे कौटुंबिक जीवन आणि राजकीय ,सामाजिक प्रवास

धर्मेंद्र जी खर्‍या आयुष्यात खूप रंगिण होते सदाबहार होते त्याचे दोन विवाह झाले होते . पहिल्या पत्नी चे नाव प्रकाश कौर होत आणि यांच्यापासून त्यांना चार मुले झाली: सनी देओल, बॉबी देओल, विजेता आणि अजीता. सनी आणि बॉबी दोन्ही बॉलिवूडमधील नक्कीच लोकप्रिय अभिनेता आहेत. दुसर्या विवाहाने अभिनेत्री आणि लोकप्रिय ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी बुधपुराणाने त्याचे नाते जोडले आणि त्या दोघांपासून त्यांना ईशा आणि आहना देओल या दोन मुली होत्या. देओल कुटुंब सिनेमा जगतात एक प्रतिष्ठित नाव आहे ज्याने तीन पीढ्या प्रेमळ चित्रपटसृष्टीला दिल्या आहेत. धर्मेंद्र यांनी कुटुंबाबद्दल खूप प्रेम आणि जबाबदारी पूर्ण केली, ज्यामुळे ते घरात तसेच चित्रपटसृष्टीतही आदर्श व्यक्तिमत्व ठरले

dharmendra ji with his wife, Hema malini ji

सलमान खान याच्या शी त्याचे एक प्रेमळ नाते होते हे अनेक वेळा दिसण्यात आले

बॉलीवूड सुपर स्टार सलमान खान याच्या सोबत धर्मेंद्र यांचे एक प्रेमळ नाते होते.सलमान च्या अनेक शो मध्ये त्यांनी उपस्थिती दर्शवली होती दस का दम मध्ये ते आपला मुलगा आणि सुपर स्टार बोबी देओल सोबत आले होते या कार्यक्रमात त्यांनी सलमान सोबत त्याचे नाते कसे आहे ते संगीतले सलमान ला ते आपला तिसरा मुलगा मानायचे तसेच सलमान खान हे सुद्धा धर्मेंद्र यांना आपले आयडॉल मनात होते . बिग बॉस च्या सेट वर सुद्धा ते अनेक वेळा आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी यायचे सलमान मध्ये ते स्वतची एक छबी पहायचे हे अनेक वेळा त्यांनी बोलून दाखवले आहे

सलमान खान सोबत धर्मेंद्र जी

दोस्ती ची एक मिसाल असणारे जय चा विरू ला शेवटचा निरोप

महान नायक धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक चित्रपट केले त्यातील अमिताभ बच्चन सोबत ची त्यांची जोडी ज्यास्त लोकप्रिय ठरली याला कारण पण त्याचा सिनेमा शोले ,आज 2025 मध्ये सुद्धा हा चित्रपट पहिला जातो या दोघांची एक वेगळी अभिनय कौशल्य होते शोले मधील त्याचे जय आणि विरू हे पात्र सपूर्ण जगाला अभिप्रेत आहे ये दोस्ती हम नहि तोडेगे तोडेगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे पर आज हा हाथ सुटला पण एकाने दम सोडल्यावर

अत्यंत दुखद अंत करणाने सलमान सोबत अमीर खान,किंग खान शाहरुख यांनी सुद्धा धर्मेंद्र यांच्या अंत्य विधी ला उपस्थिती दाखवली

आखिर दोस्ती का हाथ छूट गया धर्मेंद्र जी को अंतिम विदाई करने पोहचे उनके दोस्त और करीबी रिश्तेदार

मुंबई च्या जुहू मधील स्मशान भूमीत महान नायक धर्मेंद्र यांना अंतिम निरोप देण्यात आला

धर्मेंद्र यांना मुंबईतील जुहू येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यविधी देण्यात आली. या अंतिम संध्याकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज आणि कलाकार उपस्थित होते, ज्यात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण या अनेकांनी त्यांच्या श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या चाहत्यांनी, मित्रांनी, आणि कुटुंबीयांनी त्यांची आतून आठवण कायम ठेवली. श्रद्धांजली समारंभ सोप्या आणि भावनिक वातावरणात पार पडला. या दुःखद प्रसंगी त्यांनी जितके चित्रपटात हिम्मत आणि ऊर्जा दाखवली, तितकेच तिथेही त्यांचे कुटुंब व मित्र सर्वत्र उपस्थित होते आणि शोकवृत्त केले.

​सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघे अत्यंत भावुक झाले होते डोळ्यातून अश्रु अग्नि देताना दिसत होते.हेमा मालिनी आणि सर्वच कुटुंब भावुक झाले होते

आशा या महान नायकाला funmediamarathi कडून भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed