मुंबई : मराठी चित्रपट आणि तिचा प्रेक्षक वर्ग हा नेहमीच नवीन कहाणी आणि विचार घेऊन येत आसतो आज आपण आशाच एका चित्रपटा बद्दल बोलनात आहोत तो म्हणजे २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला “स्थळ (Sthal)” हा मराठी चित्रपट समाजातील पारंपारिक विचारसरणीवर प्रकाश टाकतो. सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर प्रस्तुत आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रातील एका मुलीच्या आयुष्याचा – “शिक्षण विरुद्ध लग्न” या संघर्षाचा वास्तववादी चित्रपट आहे.
काय आहे चित्रपटाची गोष्ट चला जाणून घेऊन येऊ
‘स्थळ’ ही कथा आहे ग्रामीण भागातील सविता नावाच्या मुलीची, जिने शिक्षणाद्वारे आपले आयुष्य घडवायचे स्वप्न पाहिले आहे. मात्र समाजाच्या बंधनांमुळे आणि लग्नाला अग्रक्रम देणाऱ्या मानसिकतेमुळे तिची स्वप्ने धुळीस मिळतात. तिचे शेतकरी आई-वडील तिच्या लग्नाची चिंता करत असतात आणि “लग्नाची गोष्ट” ही तिच्या प्रत्येक दिवसाचा केंद्रबिंदू होते.
सामाजिक वास्तवाचे जीवंत चित्र ‘स्थळ’ या चित्रपटात दर्शवले आहे
चित्रपटात भारतीय ग्रामीण समाजातील अव्यक्त पितृसत्ताक व्यवस्था, स्त्री शिक्षणाकडे दुर्लक्ष, आणि अरेंज्ड मॅरेजच्या परंपरेतील दडपण या सर्व मुद्द्यांना अत्यंत खोलीने हाताळले आहे. दिग्दर्शक सोमलकर यांनी या वास्तवाला उत्कृष्ट सिनेमॅटिक दृष्टिकोनातून उभे केले आहे. संपूर्ण कथा विदर्भातील पार्श्वभूमीवर आधारित असून, गावातील मूळलोकांच्या अभिनयातून स्थानिक रंग जिवंत झाला आहे.
चित्रपतील प्रत्येकाने अभिनय खूप उत्तम केला आहे त्या मुले प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे
या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे एक अल्प वयीन मुलगी शाळेत जाणारी नंदिनी चिकटे आणि तिचा अभिनय. त्यांनी सविताच्या भावनात्मक संघर्षाला, निराशेला आणि आशेच्या किरणाला इतक्या वास्तववादी पद्धतीने मांडले आहे की पात्र तिच्याशी तादात्म्य पावते. तिच्या डोळ्यांतील वेदना आणि आवाजातील निर्धार प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. तारानाथ खिरटकर आणि संगिता सोनेकर, सविताचे आईवडील म्हणून जबरदस्त भावनात्मक अभिनय साकारतात. विशेषतः एका दृश्यात वडिलांचा मौन संवाद, ‘काय करावे, कुठवर झुकावे?’ या प्रश्नाचे अचूक प्रतिबिंब दाखवतो
तांत्रिक दृष्टिकोनातून, सिनेमॅटोग्राफी आणि प्रॉडक्शन डिझाईन उत्कृष्ट दर्जाचे आहेत. ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनशैलीतील लहानसहान गोष्टींना फ्रेममध्ये पकडण्याचे कौशल्य वाखाणावेसे वाटते. एकमेव गीत ‘पाहुणे येत आहेत पोरी…’ प्रेक्षकांच्या मनात ठसले असून, ते गावाच्या हलकल्लोळातून समाजाच्या वास्तवाला अधोरेखित करते.



पहिलेच दिग्दर्शन तेही इतक दमदार आणि सोबत एक अशी कहाणी जी थेट काळजाला भिडते
दिग्दर्शक जयंत सोमलकर यांनी पहिल्याच चित्रपटात जे मांडले आहे ते अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी आहे. त्यांनी उपदेशात्मक भाषा टाळून वास्तवाचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचा गतीमान प्रवाह, शांत पार्श्वसंगीत आणि अप्रसिद्ध अभिनेत्यांचा नैसर्गिक अभिनय — हे सर्व मिळून ‘स्थळ’ला एक वेगळ्याच उंचीवर नेतात
‘स्थळ’ ही केवळ एका मुलीची कथा नाही; ती हजारो ग्रामीण मुलींची कहाणी आहे. ही कथा समाजाला विचार करायला लावते की “शिक्षणाच्या स्वप्नांपेक्षा लग्नच का महत्त्वाचं?” हा प्रश्न आजही तितकाच जिवंत आहे. त्यामुळे ‘स्थळ’ हा सिनेमा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर तो एक सामाजिक संदेश घेऊन येतो
बॉलीवूड कलाकारांनी केले खूप कौतुक स्थळ या चित्रपटाचे जया बच्चन यांनी ही लावली हजेरी केले
सद्या बॉलीवूड कलाकारांचा ओघ हा मराठी चित्रपट नाटक या कडे पाहण्यासाठी विशेषत वळला आहे मग देवभाभळी सारखे नाटक असो folk आख्यान सारखा संगीत कार्यक्रम असो किंवा सैराट, येरे येरे पैसा सारखे सिनेमे असो आता अशाच एक चित्रपटाची चर्चा सर्वत्र चालू आहे ती म्हणजे स्थळ अनेक बॉलीवूड अभिनेत्री व दिग्दर्शक आणि अभिनेते नी या चित्रपटाच्या स्क्रिनिंग ला हजेरी लावली खुद्द जया बच्चन यांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की असे सिनेमे हे बनायला हवे आहेत ज्या मधून एक समाजासाठी बोध घेता येतो आणि आपली संस्कृती आणि आपली शिक्षण व्यवस्था या दोन्ही गोष्टींचा योग्य मेळ या मध्ये पाहायला मिळाला तसेच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे शिवाय त्यांनी सचिन पिळगावकर यांचे सुद्धा आभार मानले.
मुलींचे शिक्षण हा पूर्वीपासून आज पर्यंत चालत आलेला एक गंभीर प्रश्न
आज आपण जरी या नवं विज्ञान युगात वावरत असलो तरी आज भारतात अनेक ठिकाणी मुलींचं शिक्षण हे टाळलं जातं किंबहुना काही मुलीचं लग्नं सुद्धा लवकर लावण्यात येते याच अनेक गावात मुलींना शिक्षण भेटत नाही त्यांना रोजगारी साठी पाठवल जात आणि मुलांना मात्र शिक्षण दिले जाते याच गोष्टीवर भर या चित्रपटात आला आहे
तुम्ही नक्की सर्वांनी हा चित्रपट सिनेमा ग्रहात जाऊन पाहावा आणि आपला मराठी सिनेमा मोठा करावा या स्थळ चित्रपटाचे ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी www.bookmyshow.com वर जा आणि आपली आवडती सीट बुक करा
