मुंबई: छावा चित्रपट १४ फेब्रुवारी ला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला या ऐतिहासिक सिनेमाला प्रेक्षकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि हेच पाहून चित्रपट निर्माते आणि त्यांच्या टीम ने हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट मराठी भाषेत अनुवाद करणार असे माहिती नुसार जाहिर केले आहे.
छावा सिनेमा पाहून प्रेक्षक झाले भावुक अनेक लोक सिनेमा बाहेर निघताना रडताना पाहण्यात आले.
छावा हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे.अखंड हिंदुस्थान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.संभाजी महाराज यांनी मोगलां बरोबर कसे युद्ध केले , औरंगजेब बरोबरची प्रत्येक लढाई त्यांनी कशा प्रकारे जिंकली हे सर्व व ४० दिवस ज्या यातना आपल्या राजन संभाजी महाराजानी भोगल्या आहेत त्या थोडक्यात या सिनेमात दाखवण्यात आले आहे . असह्य यातना या संभाजी महाराजानी भोगल्या त्या या चित्रपटात शेवटच्या ३०मिनिटांत दाखवण्यात आले आहे हे पाहुन प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू पाहण्यात आले आहे.
संभाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकला हिंदी फिल्म इंडस्ट्री चा मोठा चेहरा विकी कौशल
छावा हा चित्रपट मोडक फिल्म च्या बॅनर खाली बनत आहे. शिवाय याचे निर्माते दिग्दर्शक लक्ष्मन उतेकर आहेत. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भुमिका ही विकी कौशल यांनी निभावली आहे.उत्तम अभिनयाच्या जोरावर विकी ने आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये एक घर निर्माण केले आहे. या शिवाय या चित्रपटात येसूबाई ची भूमिका रश्मिका मंदाना यांनी केली आहे.संतोष जुवेकर या सिनेमात आपण पाहणार आहोत आशुतोष राणा असे अनेक मोठे चेहरे या चित्रपटात आपणाला पाहायल मिळतात.
छावा आता लवकरच मराठी भाषेत होणार प्रदर्शित
छावा सिनेमाचा वाढता प्रतिसाद पाहता लवकरच हा चित्रपट मराठीत अनुवाद करून पाहण्यात येणार आहे. मराठ्याचा राजा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज याचा वर कोणतीही कलाकृती ही मराठीत असायलाच हवी या अनुषंगाने नक्कीच चित्रपट मराठी भाषेत येणे योग्य आहे.
छावा चे शो चालले हाऊसफुल संपूर्ण महाराष्ट्रात मिळतोय चांगला प्रतिसाद भारता बाहेर सुद्धा चालू आहेत शो
छावा हा ऐतिहासिक चित्रपट असल्या मुळे आणि तो ही संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तम आहे,संगीत अर्थात ए .आर .रेहमान म्हणजे उत्तम, अभिनेते या सर्वांचा एक मेळ म्हणजे चित्रपट हाउसफुल प्री बुकिंग ला चांगलं प्रतिसाद मिळाला होता हा चित्रपट भारताच्या प्रत्येक राज्यात दाखवण्यात आला महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू बंगलोर, पंजाब,प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.या चित्रपटात एक महत्वाची अजून एक भूमिका आहे जी सर्व प्रेक्षकांना कुप ज्यास्त भावली आहे ती म्हणजे विनोद खन्ना यांची औरंगजेब याची भूमिका ज्या प्रमाणे सिनेमात दाखवला आहे त्यात कुठेही असे दिसत नाही की तो अक्षय खन्ना आहे.
छावा चित्रपटाने केली मोठी कमाई आता पर्यन्त चित्रपटाने केले 300 करोड पार.
छावा हा चित्रपट छावा या संभाजी महाराज यांच्या कादंबरीतून घेतलेला आहे.शिवाय अनेक पुस्तके वाचून या चित्रपटची स्क्रिप्ट बनवली गेली आहे.चित्रपटात मुख्य कलाकार विकी कौशल याने घोडस्वारी ,तलवार बाजी स्वता केली आहे या साथी त्याने चार महीने ट्रेनिंग घेतली आहे पश्चिम महाराष्ट्रात मध्ये या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे ,सातारा ,वाई आशा अनेक ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे सिनेमातला प्रत्येक सीन हा विलोभनीय आहे.प्रक्षाकांचा चांगल्या प्रतिसादा मुळे हा चित्रपट संभाजी राजांचा इतिहास पाहावं या साथी अनेक शाळा आपल्या मुलांना हा चित्रपट पहाण्यासाठी आग्रह धरत आहेत तर काही शाळा या प्रत्यक्ष त्यांना सिनेमा ग्रहात चित्रपट दाखवत आहे . याच कारणास्तव या चित्रपताची घोडदौड ही पुढे चालली आहे. आता पर्यन्त सिनेमाने 300 करोड चा पल्ला पूर्ण केला आहे. अजूनही चित्रपटचे शो फुल्ल आहेत मुंबई मध्ये विशेषता ज्यास्त चित्रपटाचे शो दाखवण्यात येत आहेत.
छावा चित्रपटाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठी साहित्य समेलनात केला गेला ही अभिमानास्पद बाबा आहे.
आखील भारतीय मराठी साहित्य समेलन नुकतेच पार पडले या साहित्य समेलन साठी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी उपस्तीत होते शिवाय राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक मान्यवर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात बोलताना छावा चित्रपट सद्या लोकप्रिय होत आहे भाषणात मुंबई चा उल्लेख झाला हिन्दी फिल्म इंडस्ट्रि मराठी फिल्म चा वाढता प्रभाव याच अनुषंगाने छावा चित्रपटाचे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करण्यात आला
सर्वांनी हा छावा चित्रपट पाहावा छत्रपती संभाजी महाराज यांनी जे बलिदान दिले आहे ते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी खाली पहावे.