मुंबई: मराठी चित्रपट , नाटक अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन झाले एक मराठी चित्रपट सृष्टीतील हिरा मानला जाणारा आज निखळला त्याच्या जाण्याने एक मोठे नुकसान झाले आहे.लोकांना खळखळून हसवणारा, रडायला लावणारा एक हरहन्नरी कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

कर्करोग निदान ते कर्करोगवर मात

काही वर्षा पुर्वी जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांना काही शारीरिक आरोग्य ठीक नसल्या कारणाने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले अनेक चाचण्या केल्या नंतर त्यांना कर्करोग कॅन्सर झाला आहे आहे हे निश्चित झाले.त्यांनी एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे जेव्हा त्यांना हे समजलं तेव्हाच त्यांनी ठरवलं आपण यावर नक्कीच मात करू डॉक्टर साहेब व सहचारिणी पत्नी यांच्या साथीनं त्यांनी या असह्य वेदना सहन करत या रोगांवर मात केली .आणि पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी हसविण्यासाठी कंबर कसली आणि काम चालू केले पण महिन्या पूर्वी थोडी तब्येत खराब होत असल्याने काम थांबवलं शेवटी दोन दिवस पूर्वी हॉस्पिटल मध्ये भरती केल्या नंतर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला

मराठी रंगभूमीचे खुप मोठे नुकसान आज अतुल परचुरे यांच्या निधनाने झाले आहे

एखादं विनोदी नाटकं जर पहायचं असेल तर पहिला चेहरा अतुल परचुरे यांचा येतो त्यांनी अनेक मराठी नाटकं केली आहेत ज्यात त्यांच्या भुमिका अजरामर झाल्या आहेत .अतुल परचुरे हे मराठी चित्रपट आणि नाटक सृष्टीतील एक अतिशय लोकप्रिय आणि गुणी कलाकार आहेत. त्यांच्या अभिनय प्रवासात त्यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. अनेक वर्षांचा त्यांचा हा प्रवास त्यांना मराठी मनोरंजन विश्वातील एक आदरणीय नाव बनवतो.आज प्रत्येक मराठी कलाकार त्यांचा आदर्श समोर ठेऊन काम करत आहे

कर्करोग उपचारा वेळी मिळाली अनेक मित्रांची साथ

कर्करोगाचं निदान झालं तेव्हा अतुल यांनी या आजाराशी अपार धैर्याने आणि आत्मविश्वासाने सामना केला. त्यांच्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी हा संघर्ष यशस्वीरित्या पार केला.या मद्ये नाना पाटेकर यांचा त्यांनी उल्लेख नक्कीच केला आणि नंतर त्यांनी सुनील गावसकर यांची भेट घालून दिली हे संगितले त्या अनेक आसे कलाकार आहेत ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पने मदत केली आहे राज ठाकरे साहेब यांनी ही त्यांना मदत केली होती या आजारातून बरे झाल्या वर त्यांनी एका मुलाखतीत मध्ये या काही खास गोष्टी ज्या त्यांच्या अडचणी च्या वेळी अनुभव्यस मिळाल्या त्या सांगितल्या .

सतत खळ खळ हसवणारा झरा ज्यांनी अनेक नाटक गाजवले

“जागो मोहन प्यारे “, “तरुण तुर्क म्हातारे अर्क”,”कापूसकोंड्याची गोष्ट”, “गेला माधव कुणीकडे”, ही सारी त्यांची गाजलेली मराठी नाटक व सिरियल आहेत जी झी वर चालू आसतात . अतुल परचुरे यांनी हिन्दी कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा मध्ये ही बराच कल काम केले आहे.लहान मुला पासून अगदी वयोवृद्ध लोकांना आपल्या अभिनयाने हसवणार अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी ज्या शेवट्याच्या सिनेमात काम केले त्याचे नाव होते अलिबाबा आणि चाळीशीले चोर

खिचडी या सिनेमात त्यांनी चाइल्ड अभिनेता म्हणून काम केले होते .त्या नंतर त्यांनी अनेक हिन्दी मराठी चित्रपटात काम केले आहे ज्या मध्ये प्रामुख्याने “बेदर्दी “,”फिर भी दिल है हिंदुस्तानी”,स्टाईल ,कया दिल ने कहा ,चोर मचाये शोर ,नवरा माझा नवसाचा ,तुमसा नाही देखा, यकीन ,नारबाची वाडी,ऑल द बेस्ट या सारखे अनेक सिनेमे त्यांनी केले आहेत आणि प्रत्येक सिनेमात त्यांनी त्यांच्या अभिनयाची झलख दाखवली आहे

या प्रवासात त्याच्या पत्नी मात्र, त्यांच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग आला जेव्हा त्यांना कर्करोगाचं निदान झालं. या आजाराशी त्यांनी अपार धैर्याने आणि आत्मविश्वासाने सामना केला. त्यांच्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी हा संघर्ष यशस्वीरित्या पार केला. अतुल परचुरे यांचा हा प्रवास त्यांची मानसिक सशक्तता आणि कठीण काळात सकारात्मक राहण्याचं महत्त्व अधोरेखित करतो.

या प्रवासात मिळाली भक्कम आशी पत्नी साथ सोनिया परचुरे यांची काय काम करतात सोनिया

अतुल परचुरे त्याच्या प्रत्येक यशा मध्ये त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा आहे नेहमीच संगत आसतता सोनिया या एक उत्तान कथक्क नृतीका आहेत सोनिया परचुरे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) ची सदस्य आहेत वयाच्या वर्षा पासून ते नृत्य करत आहेत गुरुवर्य डॉ. मंजिरी देव आणि पद्मश्री गोपी कृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली कथ्थकमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. याच बरोबर मराठी व हिन्दी चित्रपटा मध्ये ते कोरिओ ग्राफी करतात अतुल परचुरे आणि सोनिया परचुरे यांना एक मुलगी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed