Aai Kuthe Kay Karate : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ही एक प्रसिद्ध मालिका जी महाराष्ट्राच्या घरं घरामध्ये आज पर्यन्त चालत आलेली होती आता ती शेवटच्या टप्प्यात आली आहे लवकरच ही मालिका आता प्र्क्षकांचा निरोप घेणार आहे.”आई कुठे काय करते” ने सतत गेली पाच वर्ष मराठी व इतर अमराठी ज्यांना मराठी समजते आशा प्रक्षाकांचे मनोरंजन केले आहे.

प्रेक्षकांचा प्रतिसाद एकूण एपिसोड आणि थोडक्यात कथा

सुरुवातीच्या काळात जेव्हा ही मालिका चालू झाली तिला एका हिन्दी मालिके सोबत याची तुलना करण्यात आली होती. या मालिकेने थोड्याच कलावधीत सुरुवातीच्या खुप सारे यश मिळवले होते प्रत्येक एपिसोड हा वेगळा होता. ही मालिका जेव्हा सुरू केली गेली तेव्हा पासून चे आत्ता पर्यन्त प्रेक्षक या मालिकेच्या प्रत्येक नव्या भागाचा नेहमीच वाट पहायची आई च्या दैनंदिन जीवांवनावर आधारित ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जात आहे

या मालिकेची एक वेगळी ओळख आहे आपल्या प्रत्येकाच्या घरातील एक स्त्री सर्वांचा नेहमीच विचार करत आसते आशी जी व्यक्ति जिचा आपणाला जीवांच्या प्रत्येक पावलावर आठवण येते तिची सावली नेहमीच आपल्या सोबत आसते ती म्हणजे आहे आणि याचं व्यक्तीतवा वर आधारित ही संपूर्ण मालिका होती.आई किती कनखर आसते कितीही संकटे आली ती आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला नेहमीच एकत्र व सुरक्षित ठेवण्याचा कसं प्रयत्न करत आसते हे या मालिकेतून दाखवले गेला आहे.

एक कमी शिकलेली आई अरुंधीती (मालिकेतील नाव ) जिचे लग्न उच्च शिक्षित (आंनिरुद्ध मालिकेतील नाव )होते तेव्हा ज्यांचा सुखी संसार चालू आसतो तेव्हा संजना सारख्या एका दुसर्‍या बाईचे आगमन होते तेव्हा तीन मुले आसलेला सुखी संसारला नजर लागते सुशिक्षित मुल आसनार घर विस्कटाय ला लागते तेव्हा तेव्हा त्या घरातील प्रत्येकावर काय परिस्थिती ओढवते हे या मालिके मध्ये दाखवण्यात आले आहे .

एका आई च्या समोर कितीही आव्हाने आली संकटे आली तरी ती त्या सर्व संकटाना काशी सामोरे जाते आपला मोडकळीला आलेला संसार सावरण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करते आपले सासू सासरे यांची मन जपत सर्वांचा विचार करून अरुंधती आपलं गाण्याचं करियर कसं फुलवते अनिरुद्ध आणि संजना यांची सर्व कारस्थाने कशी बाहेर काढते हे आपण मागील पाच वर्षांत पाहिले आहे.

मिलिंद गवळी भावूक झाले रियालिटी शो मध्ये व्यक्त केल्या भावना

आई कुठे काय करते या मालिकेच एक प्रमुख पात्र म्हणजे मिलिंद गवळी (अनिरुद्ध) एक मराठी डान्स रियालिटी शो मध्ये या मालिकेतील सर्व कलाकारांनी हजेरी लावली त्या प्रत्येकाने आपली या मालिके बद्धल ची भावना आहे ती व्यक्त केली मिलिंद गवळी हे थोडे भावूक झाले की आज हे माझ यश पाहायला माझी आई हवी होती या मालिकेने मला खुप काही दिलं आहे प्रसिद्ध सोबत जो मान मराठी कलाकारांना मिळत नाही तो या मालिके मुळे मान मिळाला अरुंधती सुद्धा खुप भावूक झाली होतो तिच्या वा बाकी सर्व सर कलाकारांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते

मिलिंद गवळी एक ट्विट द्वारे सुद्धा आपल्या या मालिके बद्धल बोलला “जेव्हा ही मालिका सुरू झाली ती एका घरापासून आम्ही या घरात गेली पाच वर्ष सतत राहत होतो या घरा सोबत आमचं एक वेगळं नातं बनलं होत या पाच वर्षातील प्रत्येक दिवस आम्ही या घरा सोबत घालवला आहे आज जेव्हा शेवटचा भागच शूटिंग संपलं आणि या घरातील एक एक वस्तू व घराचा एक भाग पाडण्यात आला तेव्हा खुप वाईट वाटले”

मधुराणी घोखले यांनी अरुंधती ची भूमिका निभावली आहे ती सर्वोत्कृष्ट आहेच शिवाय या मालिकेतील इतर पात्र जे रुपाली भोसले ज्यांनी संजना ची भूमिका केली अभिषेक देशमुख, अश्विनी महांगडे ओमकार गोवर्धन यांनी या मालिकेला आपल्या अभिनयाने एका वेगळ्या शिखरावर नेऊन ठेवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed